छत्रपती संभाजीनगर : दिवाळी हा अनेकजणांच्या आवडीचा सण असतो, आपण त्याची वर्षभर आतुरतेनं वाट पाहतो. कारण या सणानिमित्त घरोघरी रोषणाई तर असतेच, शिवाय फराळाचा सुंगधही सर्वत्र दरवळतो. मागच्या वर्षीपेक्षा यंदा आपला फराळ उत्तम व्हावा असाच आपला प्रयत्न असतो. लाडू, चकली, करंजी, चिवडा, शेवसोबत आपण काही वेगळे पदार्थ बनवण्याचाही घाट घालतो. आपल्यालाही असा वेगळा, हटके पदार्थ बनवायचा असेल तर यंदा चुरोज् नक्कीच ट्राय करू शकता. डॉक्टर प्रज्ञा यांनी या गोड पदार्थाची सोपी रेसिपी सांगितली आहे.