पुणे : पिंपरी-चिंचवड येथील निगडी परिसरात राहणाऱ्या नीलम दिघे यांनी स्वतःच्या मेहनतीवर मोमोजचा व्यवसाय सुरू केला आहे. M.A.B.Ed पर्यंत शिक्षण झालं असतानाही नीलम यांनी नोकरीचा विचार न करता काहीतरी स्वतः करायचं ठरवलं. त्यातूनच त्यांनी छोटासा मोमोजचा स्टॉल सुरू केला. स्टॉल चालू केल्या तेव्हा सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण हार न मानता नीलम यांनी आपलं काम चालू ठेवलं. आज त्या मोमोजच्या स्टॉलमधून महिन्याला जवळपास लाखभर रुपयांची कमाई करतात. त्यांच्या या प्रवासाविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली.
Last Updated: December 05, 2025, 19:23 IST