'महाराष्ट्राचं प्रवेशद्वार' नववर्षाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री फडणवीसांचा गडचिरोली दौरा

Last Updated : गडचिरोली
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री फडणवीसांनी गडचिरोलीचा दौरा केलाय. गडचिरोली जिल्ह्यातील पेनगुंडासारख्या अति संवेदनशील भागात एका दिवसात उभारलेल्या पोलीस स्थानकाची त्यांनी पाहणी करत त्यांनी सी-60 जवानांशी संवाद साधत त्यांना मिठाईचं वाटप केलं. तर दुसरीकडे गर्देवाडा ते वांगेतुरी मार्गावरील जवळपास 15 गावांना पहिल्यांदाच बससेवा मिळाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बससेवेचे उद्घाटन झाले असून उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः एसटी बसमधून गावकऱ्यांसोबत प्रवास केला. तर लहान मुलांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत त्यांना सायकलींचं वाटपही केलं. गडचिरोलीतील आदिवासी बांधवांशी मुख्यमंत्र्यांनी बातचीत करत गडचिरोलीतील समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/गडचिरोली/
'महाराष्ट्राचं प्रवेशद्वार' नववर्षाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री फडणवीसांचा गडचिरोली दौरा
advertisement
advertisement
advertisement