वर्धा : आजकाल थायरॉईड ही झपाट्याने वाढणारी गंभीर समस्या आहे. हा आजार गळ्यात असलेल्या थायरॉईडच्या ग्रंथींच्या दुष्परिणामांमुळे होतो. दिवसेंदिवस या आजाराचे भारतामध्ये रुग्ण वाढत असताना दिसून येतात. साधारणतः भारतामध्ये सव्वाचार कोटींपेक्षा जास्त रुग्ण या समस्येने ग्रस्त आहेत. त्यातल्या त्यात महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण सर्वात जास्त बघायला मिळते. गरोदरपणा किंवा प्रसूती नंतरही प्रमाण वाढलेले दिसून येते. त्यामुळे थायरॉईडचे लक्षणे काय? आणि त्यावर आयुर्वेदिक पद्धतीने कोणते उपचार केले जाऊ शकतात यासंदर्भातच वर्धा मधील आयुर्वेद डॉक्टर नितीन मेशकर यांनी माहिती दिली आहे
Last Updated: November 11, 2025, 16:45 IST