कोल्हापूर : कॅन्सरवरील एक प्रभावी उपचार पद्धती म्हणून किमोथेरपीकडे पाहिले जाते. मात्र या किमोथेरपीमुळे होणाऱ्या छोट्या-मोठ्या दुष्परिणामांमुळे बरेच रुग्ण किमोथेरपी करण्यास घाबरत असतात. मात्र हे दुष्परिणाम तात्पुरत्या स्वरुपाचे असतात. या किमोथेरपीमुळे रुग्णांना कॅन्सर विरोधात लढण्यास मदतच होत असते. याच किमोथेरपीबाबत सर्व आवश्यक माहिती कोल्हापूरच्या डॉ. रेश्मा पवार यांनी दिली असून कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या त्या संचालिका आहेत



