टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भाने केलेल्या विधानावर राज्यभरात भारतीय जनता पक्षाने केलेल्या आक्रमक आंदोलनानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे.मी तुलना केलेली नाही. पण सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. तरीही ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्याप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सपकाळ म्हणाले.प्रकरणी भाजपचा तीव्र शब्दात निषेध करतो त्यांच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्या बद्दल शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता.



