भिवंडी महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवली आणि सर्वात जास्त ३० नगरसेवक विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला पण बहुमतासाठी आणखी ४ नगरसेवकांची आवश्यकता होती. भाजप आणि शिंदेसेनेसोबत जायचे नाही ही काँग्रेसची भूमिका आहे, त्या भूमिकेशी काँग्रेसने त़डजोड केली नाही. आता भाजपाचे काही नगरसेवक पक्षाचा आणि विचारांचा त्याग करून धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी झाले असून भिवंडीचा महापौर आणि उपमहापौर सेक्युलर फ्रंटचा होईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.



