सोलापूर: पिकाची किंवा पालेभाज्याची लागवड करत असताना योग्य माहिती घेऊन त्याचा अभ्यास करून लागवड केल्यास कमी क्षेत्रफळामध्ये सुद्धा अधिक उत्पन्न घेता येते हे सिद्ध करून दाखवलंय. मोहोळ तालुक्यातील पेनुर गावात राहणाऱ्या अरविंद चौरे यांनी पाऊण एकारात भेंडीची लागवड केली असून यासाठी 25 हजार रुपयेपर्यंत खर्च आला आला आहे. तर सर्व खर्च वजा करून आतापर्यंत दीड लाखांचे उत्पन्न अरविंद यांना मिळाले आहे. तर भेंडीची तोडणी सुरू असून तोडणी संपेपर्यंत भेंडी विक्रीतून दोन ते अडीच लाख रुपयांचा उत्पन्न अरविंद चौरे यांना मिळणार आहे.
Last Updated: Dec 01, 2025, 13:33 IST


