विज्ञान हादरवणारा शोध, 12 कोटी वर्षांपूर्वीचा चमत्कारच; डायनासोर काळातील दुर्मिळ जीव सापडला, शास्त्रज्ञ थक्क

Last Updated:

Two-headed Animal: दोन डोकी असलेला 120 दशलक्ष वर्षांपूर्वीचा जीवाश्म चीनमध्ये सापडल्याने विज्ञान जगत हादरले आहे. ‘हायफॅलोसॉरस’ नावाचा हा दुर्मिळ जीव निसर्गातील विलक्षण रहस्य उघड करतो.

News18
News18
बीजिंग: दोन डोकी असलेल्या जीवांबद्दलच्या कथा अनेकदा आपल्याला आश्चर्यचकित करतात. कधी साप, कधी कासव, तर कधी माशांमध्ये असे दुर्मिळ दोष आढळतात. पण विचार करा डायनासोरच्या काळातही असे घडत होते. एका जुन्या अभ्यासातून हा खुलासा झाला आहे, ज्याने विज्ञानाच्या जगाला हादरवून सोडले.
2006 मध्ये चीनच्या संशोधकांनी 'हायफॅलोसॉरस' (Hyphalosaurus) नावाच्या एका लहान जलीय प्राण्याचे जीवाश्म (फॉसिल) शोधले. हा जीव सुमारे 120 दशलक्ष वर्षांपूर्वी तलावांमध्ये राहत होता. हायफॅलोसॉरसचे हजारो जीवाश्म आजपर्यंत सापडले आहेत, परंतु हा शोध सर्वात वेगळा आहे. कारण यात दोन पूर्ण डोकी आणि लांब माने आहेत. पेक्टोरल गिर्डलच्या (pectoral girdle) पुढे मणका दोन भागांमध्ये विभागला जातो आणि दोन्ही बाजूंना डोकी तयार होतात, असे संशोधकांनी लिहिले आहे.
advertisement
दोन डोकी असलेल्या प्राण्यांमागे काय आहे विज्ञान?
शास्त्रज्ञांच्या मते, या स्थितीला ‘एक्सियल बायफरकेशन’ (Axial Bifurcation) म्हणतात. जेव्हा एक भ्रूण जुळे बनण्याचा प्रयत्न करतो. पण ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही, तेव्हा असे घडते. याचा परिणाम म्हणून एकाच शरीरावर दोन डोकी तयार होतात. आजच्या काळातही साप, कासव, हरीण आणि माशांमध्ये ही स्थिती दिसून आली आहे. परंतु असे प्राणी जास्त काळ जिवंत राहू शकत नाहीत. म्हणूनच हा हायफॅलोसॉरस फक्त 70 मिलिमीटर लांब होता आणि असे दिसते की तो जन्मानंतर लगेचच मरण पावला.
advertisement
हा आतापर्यंतचा सर्वात जुना दोन डोके असलेला जीवाश्म मानला जातो. आणि तो सापडणे अत्यंत दुर्मिळ आहे. कारण लाखो वर्षांत खूप कमी जीव जीवाश्म म्हणून वाचू शकले आहेत. अशा परिस्थितीत अशी अनोखी घटना सापडणे संशोधकांसाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.
सुरुवातीला काही लोकांनी याला बनावट जीवाश्म म्हटले होते. कारण त्या भागात यापूर्वीही बनावट जीवाश्म सापडल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण तपासणीत हे स्पष्ट झाले की, हाडांवर बारीक माती चिकटलेली होती आणि दगडाचा थर पूर्णपणे सुरक्षित होता. त्यात कोणताही गोंद किंवा जोडण्याचे चिन्ह आढळले नाही.
advertisement
या अभ्यासाचा निष्कर्ष असा होता की- हा जीवाश्म पूर्णपणे खरा आहे आणि आतापर्यंतच्या नोंदीमध्ये तो अनोखा आहे. या शोधामुळे हे सिद्ध झाले की निसर्गाची रहस्ये आजही जितकी आश्चर्यकारक आहेत. तितकीच ती कोट्यवधी वर्षांपूर्वीही होती. हा अभ्यास 2006 मध्ये 'बायोलॉजी लेटर्स' (Biology Letters) जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
विज्ञान हादरवणारा शोध, 12 कोटी वर्षांपूर्वीचा चमत्कारच; डायनासोर काळातील दुर्मिळ जीव सापडला, शास्त्रज्ञ थक्क
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement