मोठी बातमी! इमारतीला भीषण आग; 43 जणांचा होरपळून मृत्यू, 22 जण गंभीर जखमी
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे, या आगीत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत.
ढाका, प्रतिनिधी : बांगलादेशची राजधानी ढाक्यामध्ये गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली आहे. एका सात मजली इमारतीला आग लागली. या भीषण आगीमध्ये 43 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या घटनेत 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. आरोग्यमंत्री डॉ. सामंत लाल सेन यांनी या घटनेबाबत अधिकृत माहिती दिली. या आगीच्या घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
बांगलादेशच्या अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या इमारतीला गुरुवारी रात्री अंदाजे 9: 50 सुमारास आग लागली. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक हॉटेल आहे, या हॉटेललाच सर्वप्रथम ही आग लागली. त्यानंतर काही क्षणात आगीनं रौद्र रूप धारण केलं. आग दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली. तिथे एक कपड्याचं दुकानं होतं, ते देखील या आगीत जळून खाक झालं. आग लागल्याचं लक्षात येताच 75 नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. मात्र ज्यांना बाहेर पडता आलं नाही, त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला असून, 22 जण गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
आरोग्यमंत्री सेन यांनी म्हटलं आहे की या दुर्घटनेत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. ढाका मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलेल्या 33 जणांचा मृत्यू झाला आहे, तर दुसरीकडे शेख हसीना नॅशनल इंस्टीट्यूटमध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी दहा जणांना डॉक्टरांनी मृत घोषीत केलं आहे. या घटनेत 22 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
March 01, 2024 8:00 AM IST


