प्राचीन हिंदू मंदिराचा वाद पुन्हा भडकला; 1,25,000 नागरिक घर सोडून पाळाले; थायलंड–कंबोडिया सीमेवर रक्तपात
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Thailand–Cambodia Border Clashes: थायलंड–कंबोडिया सीमारेषेवर पुन्हा एकदा भीषण संघर्ष भडकला असून दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ल्याचे आरोप करत प्रतिहल्ले सुरूच ठेवले आहेत. वाढत्या मृत्यूसंख्या आणि हजारो नागरिकांच्या पलायनामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे.
नॉम पेन्ह: थायलंड आणि कंबोडियामधील वादग्रस्त सीमारेषेवर पुन्हा उफाळलेल्या संघर्षाने दोन्ही देशांनी एकमेकांवर दोषारोपांची मालिका सुरू केली आहे. दोन्ही देशात तणाव वाढत आहे आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत असताना संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी झालेल्या चकमकींपासून आतापर्यंत नऊ नागरिकांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. तर थाई सैन्याच्या माहितीनुसार मंगळवारी आणखी दोन सैनिकांचा मृत्यू झाल्याने थायलंडकडील एकूण मृतांचा आकडा 3 झाला आहे. तसेच 29 सैनिक जखमी झाले आहेत.
advertisement
रविवार रात्री झालेल्या चकमकीत एका थाई सैनिकाचा मृत्यू झाल्यापासून हिंसाचार पुन्हा पेटला. या संघर्षामुळे दहा हजारो नागरिकांना घर सोडून पळ काढावा लागला. जुलै महिन्यात झालेल्या पाच दिवसांच्या संघर्षानंतर निर्माण झालेली अस्थिर शांतता यामुळे पुन्हा एकदा भंगली आहे.
advertisement
जुलैतील चकमकीदरम्यान रॉकेट्स आणि जड तोफगोळ्यांची देवाणघेवाण झाली होती. ज्याला सीमावादाने अधिक खतपाणी घातले होते. त्या वेळी दोन्ही देशांकडून किमान 48 जणांचा मृत्यू झाला होता आणि 3 लाखांहून अधिक नागरिकांना स्थलांतर करावे लागले होते. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरता तह झाला होता.
advertisement
मात्र गेल्या महिन्यात थायलंडने आपल्या एका सैनिकाला अपंग करणाऱ्या लँडमाइन स्फोटानंतर तहाची अंमलबजावणी स्थगित केली.
लढण्यास भाग पाडले गेले
कंबोडियाचे प्रभावशाली सिनेट अध्यक्ष हुन सेन यांनी सोशल मीडियावर दिलेल्या निवेदनात सांगितले की, सोमवारी कंबोडियन सैन्याने थाई दलांवर गोळीबार करण्याचे टाळले होते, परंतु रात्रीपासून त्यांनी प्रतिउत्तर देणे सुरू केले. त्यांनी म्हटले की थाई सैन्य ज्या भागांमध्ये पुढे सरकत आहे. तिथे लक्ष्य साधून कंबोडियाचे सैन्य शत्रूला कमकुवत करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी उत्तर देत आहेत. कंबोडियाला शांतता हवी आहे, परंतु आपल्या भूभागाचे संरक्षण करण्यासाठी लढावे लागत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
थायलंडच्या सैन्याने सांगितले की, मंगळवारी पहाटे कंबोडियाने पूर्व साकेओ प्रांतातील एका गावावर तोफगोळे टाकण्यात आले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. इतकेच नाही तर कंबोडियाने रॉकेट्स आणि ड्रोनद्वारे थाई ठिकाणांवर हल्ले केले. दोन्ही बाजू पहिला गोळीबार कोणी केला याबाबत एकमेकांवरच आरोप करत आहेत.
advertisement
सध्या चर्चेला वाव नाही
मंगळवारी दिलेल्या निवेदनात थाई नौदलाने सांगितले की समुद्रकिनारी असलेल्या ट्रॅट प्रांतात त्यांनी कंबोडियन सैन्याला हुसकावून लावण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. नौदलाचे म्हणणे आहे की कंबोडियन सैन्याने त्या प्रदेशात आपली उपस्थिती वाढवली असून स्नायपर्स, जड शस्त्रे, बंकर आणि खंदक उभारले आहेत, जे थायलंडच्या सार्वभौमत्वाला गंभीर आणि थेट धोका आहे.
advertisement
थायलंडचे परराष्ट्रमंत्री सिहासाक फुआंगकेटकेओ यांनी म्हटले की कंबोडिया शांतता चर्चेसाठी “तयार नाही”. “त्यांच्या वक्तव्यांमध्ये ते स्वतःला तयार असल्याचे सांगतात, परंतु जमिनीवरील परिस्थिती अगदी उलट आहे,” असे त्यांनी सांगितले. धोरणात्मक चर्चा तेव्हाच शक्य होते जेव्हा परिस्थिती त्यासाठी मोकळीक देते आणि सध्या ती मोकळीक उपलब्ध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही बाजूंवर सुरू असलेल्या हिंसाचारामुळे सीमेलगतच्या नागरिकांना स्थलांतर करावे लागत आहे. थायलंडच्या दुसऱ्या आर्मी रिजनने सांगितले की चार सीमावर्ती प्रांतांमध्ये जवळपास 500 तात्पुरत्या निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात 1 लाख 25 हजाराहून अधिक नागरिक राहतात.
शतकभर जुना सीमावाद
1907 मध्ये फ्रान्सने आखलेल्या 817 किमी लांबीच्या सीमा नकाशावरून थायलंड आणि कंबोडियामधील सार्वभौमत्वाचे दावे आजही कायम आहेत. या भागात गेल्या अनेक दशकांत तणाव वाढत राहिला असून, कधीमधी चकमकीही झाल्या आहेत. 2011 मध्ये एका आठवडाभर चाललेल्या तोफगोळ्यांच्या युद्धानंतरही प्रश्न सुटला नाही.
2013 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) दिलेल्या निकालात प्रीह विहार मंदिरालगतचा काही भूभाग कंबोडियाला देण्यात आला आणि त्या परिसरातून थायलंडने आपले कर्मचारी हटवावेत, असे आदेश दिले. मात्र थायलंडने या प्रकरणात ICJ च्या अधिकारक्षेत्राला मान्यता दिलेली नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2025 4:30 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
प्राचीन हिंदू मंदिराचा वाद पुन्हा भडकला; 1,25,000 नागरिक घर सोडून पाळाले; थायलंड–कंबोडिया सीमेवर रक्तपात


