Emergency लँडिंगने यंत्रणा अलर्टमोडवर, सुपरपॉवर देशात खळबळ; धोकादायक फायटर जेटला भारतात प्रवेशबंदी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
F 35 Fighter Jet: जपानमध्ये ब्रिटिश मालकीच्या अमेरिकन F-35 फायटर जेटचे अचानक तांत्रिक बिघाडामुळे Emergency लँडिंग झाले. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे भारत हा महागडे डील रद्द करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.
टोकियो: अमेरिकेचे सर्वात आधुनिक आणि महागडे लढाऊ विमान F-35 पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडामुळे चर्चेत आले आहे. ताजे प्रकरण जपानमधील आहे. जिथे ब्रिटनच्या मालकीच्या एका अमेरिकन F-35B स्टेल्थ फायटरला रविवारी अचानक तांत्रिक बिघाडामुळे जपानच्या कागोशिमा प्रांतातील एका विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. हे विमान प्रशिक्षण मोहिमेवर होते आणि ब्रिटिश कॅरिअर स्ट्राइक ग्रुपसोबत तैनात होते, असे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा F-35 च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
केरळमध्येही झाले होते आपत्कालीन लँडिंग
ही काही पहिलीच वेळ नाही. सुमारे दोन महिन्यांपूर्वी एका ब्रिटिश F-35B ला ‘टेक्निकल स्नॅग’(तांत्रिक अडचण) मुळे केरळमधील कोचीन विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली होती. तेव्हा हे विमान अनेक आठवडे तिथेच उभे होते. कारण त्याचे सुटे भाग (स्पेयर पार्ट्स) आणि तांत्रिक टीम येण्यास खूप वेळ लागला होता. त्यावेळीही आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये F-35 च्या तांत्रिक गुंतागुंतीबद्दल आणि त्याच्या देखभालीवर होणाऱ्या मोठ्या खर्चाबद्दल चर्चा झाली होती.
advertisement
भारत F-35B का खरेदी करत नाही?
आता जपानमधील घटनेनंतर हा प्रश्न निर्माण होतो की- ज्या विमानाला अमेरिका आपला ‘स्टार प्रोडक्ट’ म्हणून सादर करते, ते खरोखरच विश्वासार्ह आहे का? विशेषतः अशा वेळी जेव्हा अमेरिका हे विमान भारताला विकण्याचा प्रयत्न करत आहे.
अमेरिका बऱ्याच काळापासून भारताला F-35 स्टेल्थ फायटर खरेदी करण्यासाठी आग्रह करत आहे. पण भारतीय हवाई दल त्याच्या बाजूने नाही. यामागे स्पष्ट कारणे आहेत: या विमानाचा अत्यधिक देखभाल खर्च, वारंवार होणारे तांत्रिक बिघाड आणि लॉजिस्टिक सपोर्टमध्ये विलंब. भारत आधीच सुखोई, राफेल आणि स्वदेशी तेजस यांच्या मिश्रणावर काम करत आहे आणि त्याची प्राथमिकता स्वदेशी AMCA (Advanced Medium Combat Aircraft) प्रकल्पाला पुढे नेण्याची आहे. अशा परिस्थितीत जे विमान सतत तांत्रिक बिघाडांमुळे चर्चेत आहे ते खरेदी करणे भारतासाठी ना धोरणात्मकदृष्ट्या फायदेशीर आहे ना आर्थिकदृष्ट्या.
advertisement
ट्रम्प साहेब! भारताला हे विमान नको आहे
view commentsडोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्या टीमने भारताला अनेक वेळा हे विमान विकण्याचा प्रस्ताव दिला. पण संरक्षण मंत्रालयाने त्यात स्वारस्य दाखवले नाही. जपान आणि केरळमधील घटना हे दर्शवतात की- हे विमान कागदावर स्टेल्थ डिझाइन, हाय-टेक एव्हियोनिक्स आणि मल्टी-रोल क्षमतेसह उत्कृष्ट दिसत. पण प्रत्यक्षात त्याची ऑपरेशनल उपलब्धता आणि विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यामुळे ट्रम्प साहेब जर तुमचे ‘स्टार प्लेन’ वारंवार धावपट्टीवरच उभे राहत असेल तर भारत त्याला धावपट्टीवर उतरवण्याआधीच डील नाही असे म्हणावे लागले असे दिसते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 10, 2025 9:55 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Emergency लँडिंगने यंत्रणा अलर्टमोडवर, सुपरपॉवर देशात खळबळ; धोकादायक फायटर जेटला भारतात प्रवेशबंदी


