NASAने दिला धोक्याचा इशारा, 3 फुटबॉल मैदानांएवढा मोठा Asteroid पृथ्वीच्या दिशेने; वेग पाहून अंगावर काटा येईल

Last Updated:

Asteroid NASA Warning 2025: एस्टेरॉयड 2003 MH4 पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे आणि २४ मे २०२५ रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. हा एस्टेरॉयड ३३५ मीटर रुंद असून १४ किमी/सेकंद वेगाने प्रवास करत आहे.

News18
News18
वॉशिंग्टन: पृथ्वीच्या दिशेने एक प्रचंड मोठा लघुग्रह (एस्टेरॉयड) वेगाने येत आहे आणि जर तो पृथ्वीवर आदळला तर मोठी हाहाकार होण्याची शक्यता आहे. या लघुग्रहचे नाव आहे ‘एस्टेरॉयड 2003 MH4’. हा एस्टेरॉयड सुमारे ३३५ मीटर रुंद आहे. म्हणजेच जवळपास तीन फुटबॉल मैदानांएवढा मोठा आहे. नासाच्या वैज्ञानिकांनुसार हा एस्टेरॉयड २४ मे २०२५ रोजी पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. त्याची गती इतकी जास्त आहे की ऐकूनच अंगावर काटा येतो. 2003 MH4 हा १४ किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने प्रवास करत आहे.
पृथ्वीपासून किती अंतरावर असेल?
नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (JPL) नुसार हा एस्टेरॉयड पृथ्वीपासून ६.६८ दशलक्ष किलोमीटरच्या अंतरावरून जाईल. ऐकायला हे अंतर खूप जास्त वाटत असले. तरी खगोल विज्ञानाच्या भाषेत ते खूप कमी मानले जाते. नासा कोणत्याही अशा वस्तूला ‘पोटेंशियली हॅझार्डस’ (Potentially Hazardous) मानते, जी १५० मीटरपेक्षा मोठी असेल आणि ७.५ दशलक्ष किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरून जाईल. 2003 MH4 दोन्ही अटी पूर्ण करतो.
advertisement
हा एस्टेरॉयड कोणत्या गटातील आहे?
हा एस्टेरॉयड अपोलो (Apollo) गटाचा भाग आहे. हा एस्टेरॉयड्सचा असा समूह आहे. ज्यांची कक्षा पृथ्वीच्या कक्षेला छेदते. अपोलो गटातील एस्टेरॉयड्सची संख्या २१,००० पेक्षा जास्त आहे आणि यापैकी अनेकांबद्दल भविष्यात पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच कारणामुळे नासाचे सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीज (CNEOS) या सर्वांवर सतत लक्ष ठेवून आहे.
advertisement
सध्या धोका नाही, पण…
सध्या 2003 MH4 पृथ्वीवर आदळणार नाही. परंतु त्याचा मार्ग आणि आकार या दोन्ही गोष्टी त्याला धोक्याच्या श्रेणीत ठेवतात. वैज्ञानिक यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जेणेकरून त्याची पुढील हालचाल आणि संभाव्य धोका यांचा अंदाज लावता येईल. विशेष म्हणजे हा एस्टेरॉयड दर ४१० दिवसांनी एकदा सूर्याभोवती प्रदक्षिणा करतो. म्हणजेच भविष्यात त्याची पृथ्वीशी भेट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
asteroid news, asteroid alert by nasa, nasa asteroid warning, asteroid hitting earth, Asteroid 2003 MH4, asteroid coming to earth, एस्टेरॉयड, एस्टेरॉयड कब गिरेगा, एस्टेरॉयड न्यूज़, एस्टेरॉयड नासा अलर्ट
आणखीही आहेत धोकादायक पाहुणे
2003 MH4 एकटा नाही. यापूर्वी अपोफिस (Apophis) नावाचा एस्टेरॉयड २०२९ मध्ये पृथ्वीवर आदळण्याचा धोका वर्तवण्यात आला होता. परंतु आता वैज्ञानिकांनी त्याला सुरक्षित घोषित केले आहे. त्याचप्रमाणे 2024 YR4 आणि 2025 FA22 नावाच्या एस्टेरॉयड्सवरही लक्ष ठेवले जात आहे. विशेषतः 2025 FA22 बद्दल असा अंदाज आहे की तो २०८९ मध्ये पृथ्वीच्या खूप जवळून जाईल. मात्र टक्कर होण्याची शक्यता केवळ ०.०१% आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
NASAने दिला धोक्याचा इशारा, 3 फुटबॉल मैदानांएवढा मोठा Asteroid पृथ्वीच्या दिशेने; वेग पाहून अंगावर काटा येईल
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement