रिपोर्टिंग करत असताना महिला पत्रकाराला गोळी मारली, थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद; थरारक Video
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Viral Video: अमेरिकेच्या लॉस एंजेलसमध्ये डिपोर्टेशन मोहिमेनंतर उसळलेल्या हिंसक आंदोलनात थेट रिपोर्टिंग करत असलेल्या ऑस्ट्रेलियन महिला पत्रकाराला पोलिसांनी गोळी मारल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
लॉस एंजेलस: अमेरिकेतील लॉस एंजेलसमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका महिला पत्रकाराला Live रिपोर्टिंग करत असताना गोळी लागल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. संबंधित महिला रिपोर्टर एका घटनास्थळावरून वार्तांकन करत असताना तिच्या मागे उभ्या असलेल्या दंगलविरोधी पथकातील एका जवानाने तिच्या पायावर गोळी झाडली.
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, एक महिला रिपोर्टर घटनास्थळाहून रिपोर्टिंग करत होती. तेवढ्यात पाठीमागे उभ्या असलेल्या दंगल विरोधी पोलिस जवानांपैकी एकाने तिच्या पायावर गोळी झाडली. ज्या महिला रिपोर्टरच्या पायावर गोळी लागली आहे ती ऑस्ट्रेलियाची असल्याचे म्हटले जात आहे. महिला रिपोर्टरचं नाव लॉरेन टोमासी असे आहे. लॉस एंजेल्समध्ये ती विरोध प्रदर्शनाच्या दरम्यान थेट ग्राउंड रिपोर्टिंग करत होती. पत्रकाराचा असा दावा आहे की एका अधिकाऱ्याने जाणूनबुजून तिला लक्ष्य केले.
advertisement
In LA, riot police shot an Australian journalist with a rubber bullet, apparently without provocation, as she was reporting from the scene. pic.twitter.com/CFtP92e9kS
— Pekka Kallioniemi (@P_Kallioniemi) June 9, 2025
डिपोर्टेशन रेडनंतर सुरू झाला होता विरोध
ट्रम्प प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी काही भागांमध्ये डिपोर्टेशनसंदर्भात छापे टाकले होते. त्यानंतर काही लोकांना अटक करण्यात आली होती. ज्यांच्यावर बेकायदेशीररीत्या अमेरिकेत राहण्याचा आरोप होता. या घटनेनंतरच फेडरल इमिग्रेशनच्या डिपोर्टेशन मोहिमेविरोधात विरोध आंदोलन सुरू झाले आणि त्यानंतर हिंसक घटना घडली.
advertisement
ऑस्ट्रेलियन रिपोर्टरला रबरी गोळी मारली
एका ऑस्ट्रेलियन मीडिया हाउसची रिपोर्टर लॉरेन टोमासी हिंसक विरोध प्रदर्शनाचं थेट प्रक्षेपण करत होती. तिचा आरोप आहे की याचदरम्यान गर्दी पांगवण्यासाठी वापरण्यात येणारी रबरी गोळी तिच्यावर वापरण्यात आली. ती शांतपणे रिपोर्टिंग करत होती. तेवढ्यात पाठीमागे उभ्या असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने तिच्या पायावर गोळी झाडली.
परिस्थिती बिघडल्यानंतर गोळी झाडली
व्हिडिओमध्येही गोळी लागण्याची घटना कैद झाली आहे. तिचं म्हणणं आहे की ती त्या भागात अनेक तासांपासून उभी होती आणि विरोध प्रदर्शनाचं कव्हरेज करत होती. तेवढ्यात परिस्थिती झपाट्याने बिघडली. त्यानंतर लॉस एंजेल्स पोलीस (LAPD) घोड्यावरून पुढे आले आणि रबरच्या गोळ्या झाडायला लागले. याचदरम्यान कॅमेरा काही काळ डावीकडे फिरतो. त्यात शस्त्रधारी अधिकाऱ्यांची एक रांग दिसते. त्यापैकी एक बंदूक उचलतो आणि थेट टोमासीवर निशाणा घेताना दिसतो.
advertisement
गोळी लागल्याच्या आवाजासोबतच टोमासी किंचाळते आणि पाठीमागून आवाज येतो की, तुम्ही आत्ताच रिपोर्टरला गोळी मारली आहे. तसंच बॅकग्राउंडमध्ये रिपोर्टरचा आवाजाही स्पष्ट ऐकू येतात. मात्र यामध्ये टोमासीला दुखापत झाली असली तरी ती गंभीर स्वरूपाची नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 09, 2025 3:14 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
रिपोर्टिंग करत असताना महिला पत्रकाराला गोळी मारली, थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद; थरारक Video


