चीनच्या चोरीचा 'विनाशकारी' मामला; अमेरिका, रशियासह जगाला सर्वात मोठा धोका; भारताचे काय होणार!
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Copycat China: चीनच्या वाढत्या लष्करी ताकदीमागे 'कॉपीकॅट' धोरण असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. अमेरिका आणि रशियासह अनेक देशांकडून तंत्रज्ञान चोरून चीनने आपली अत्याधुनिक शस्त्रे बनवली असल्याचा आरोप होत आहे. ज्यामुळे जागतिक सुरक्षा धोक्यात आली आहे.
बीजिंग: चीनची लष्करी ताकद ज्या वेगाने वाढली आहे. त्याच वेगाने त्यावर 'कॉपीकॅट' म्हणजेच नक्कल करणारा देश असल्याचा आरोपही होत आहे. ड्रोनपासून ते स्टील्थ फायटर जेटपर्यंत—चीनने अमेरिका, रशिया, इस्त्राईल आणि युरोपीय देशांच्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाची नक्कल करून आपली शस्त्रे बनवली असल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला आहे. चीन खरोखरच स्वतःच्या बळावर उभा आहे की चोरीच्या तंत्रज्ञानाने त्याचे लष्करी साम्राज्य निर्माण झाले आहे? चीनने कथितपणे इतर देशांकडून चोरून बनवलेल्या 6 धोकादायक शस्त्रांबद्दल जाणून घेऊयात...
1.
चीन: शेनयांग जे-31 (Shenyang J-31)
लॉकहीड मार्टिन एफ-35 लाइटनिंग II (Lockheed Martin F-35 Lightning II)
चीनचे शेनयांग एफसी-31 गायरफॉलकन (Shenyang FC-31 Gyrfalcon) ज्याला जे-31 किंवा जे-35 असेही म्हटले जाते. त्याची तुलना अमेरिकेच्या अत्याधुनिक एफ-35 लाइटनिंग II (F-35 Lightning II) शी केली जाते. ही तुलना केवळ तांत्रिकच नाही. तर चोरीच्या आरोपांशीही जोडलेली आहे. चिनी हॅकर्सनी अमेरिकन संरक्षण कंपन्यांकडून एफ-35 चे डिझाइन प्लान्स चोरले होते. यामध्ये विमानाचा स्टील्थ आकार (Stealth Shape), रडार सिग्नेचर कमी करण्याचे तंत्रज्ञान आणि इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या गरम वायू थंड करणारी विशेष प्रणाली (cooling system) यांचा समावेश होता. या चोरी केलेल्या माहितीच्या आधारेच चीनने जे-31 विकसित केले.
advertisement

2.
चीन: सीएत-४बी (CH-4B)
अमेरिका: एमक्यू-9 रिपर ड्रोन (MQ-9 Reaper Drone)
चीनचा सीएत-4बी (CH-4B) ड्रोन हा अमेरिकेच्या एमक्यू-९ रिपर ड्रोनचा (MQ-9 Reaper) जवळजवळ क्लोन मानला जातो आणि यात इतकी समानता आहे की विशेषज्ञ याला "कॉपीकॅट ड्रोन" म्हणतात. दोन्ही ड्रोनमध्ये समोरच्या बाजूला नोझ-माउंटेड सेन्सर टरेट (nose-mounted sensor turret) असतो. ज्यात दिवस आणि रात्रीच्या ऑपरेशनसाठी डे-टाइम (daytime) आणि इन्फ्रा-रेड (infra-red) कॅमेरे समाविष्ट आहेत. सीएत-४बी मध्ये 6 एक्सटर्नल हार्ड पॉइंट्स (external hard points) आहेत. ज्यावर ते सुमारे 770 पाउंड (अंदाजे 350 किलो) पर्यंत शस्त्रे वाहून नेऊ शकते. ही फायरपावर अमेरिकेच्या रिपरसारखीच आहे. मात्र सीएत-4बी चे इंजिन रिपरपेक्षा कमकुवत आहे आणि त्याची पेलोड क्षमताही (payload capability) कमी आहे. ते जास्त काळ हवेत राहण्याच्या क्षमतेसाठी (loitering capability) डिझाइन केले आहे. चीनने ही तंत्रज्ञान केवळ कॉपी केले नाही. तर ते रणनीतिकदृष्ट्या आपल्या गरजेनुसार बदलले.
advertisement

3.
चीन:वाय-20 (Y-20)
अमेरिका: बोइंग सी-17 ग्लोबमास्टर (Boeing C17 Globemaster)
चीनचे वाय-20 (Y-20) मिलिटरी ट्रान्सपोर्ट विमान हे अमेरिकेच्या सी-17 ग्लोबमास्टर III (C-17 Globemaster III) ची एक जबरदस्त नक्कल मानली जाते. केवळ आकार आणि मालवाहू क्षमतेतच नाही, तर डिझाइन लेआउटमध्येही. अहवालानुसार वाय-20 चा विकास चोरी केलेल्या बोइंग डिझाइनच्या आधारे झाला आहे. जे सी-17 चे होते. 2009मध्ये बोइंगच्या एका माजी कर्मचाऱ्याला सी-17 आणि इतर विमाने, रॉकेट, हेलिकॉप्टरची तांत्रिक माहिती चीनला विकल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते. ज्यामुळे या कॉपीची पुष्टी अधिक मजबूत होते. मात्र अमेरिकेच्या सी-17 मध्ये प्रॅट अँड व्हिटनीचे (Pratt & Whitney) उच्च-कार्यक्षमतेचे टर्बोफॅन इंजिन (turbofan engine) वापरले जाते. तर वाय-20 मध्ये जुने रशियन सोलोविएव्ह डी-30 (Soloviev D-30) इंजिन वापरले आहे. जे ताकद, इंधन कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेत खूप मागे आहे. यावरून स्पष्ट होते की चीनने जरी डिझाइन चोरले असले तरी तांत्रिक क्षमतेत ते अजूनही अमेरिकेपासून खूप दूर आहे.
advertisement

4.
चीन: टाईप-96 (Type 96)
रशिया: टी-72 टँक (Soviet T-72 Tank)
चीनचा टाईप-96 (Type 96) टँक रशियाच्या टी-72 टँकसारखा (T-72 Tank) दिसतो आणि तंत्रज्ञानातही तो खूप काही रशियन टँकसारखाच आहे. यात 125 एमएमची मुख्य तोफ, आपोआप गोळ्या लोड करणारी प्रणाली (ऑटोमॅटिक लोडर) आणि रशियन टँकमधून घेतलेली सुरक्षा तंत्रज्ञान जसे की मजबूत आर्मर (कवच) आणि संरक्षक प्रणाली बसवल्या आहेत. टँकच्या समोरील भागात म्हणजे ग्लेसिस प्लेटवर (glacis plate) स्फोटक रिएक्टिव्ह आर्मर (ERA) आणि टॉवरच्या समोर ॲड-ऑन आर्मर (add-on armor) लावला आहे. जो रशियाच्या जुन्या टी-72ए टँकच्या 'सुपर डॉली पार्टन' (Super Dolly Parton) सारख्या डिझाइनची आठवण करून देतो. टी-72 ची डिझाइनिंग 1960 च्या दशकात झाली होती. तर टाईप-96 चीनने 1990 च्या दशकात तयार केला. दोघांची ताकद आणि शस्त्र क्षमता जवळजवळ सारखीच आहे. हे स्पष्टपणे दर्शवते की चीनने आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी इतर देशांच्या तंत्रज्ञानाची नक्कल करून आपले टँक बनवले - नवकल्पना (इनोव्हेशन) कमी आणि कॉपी जास्त.
advertisement

5.
चीन:शेनयांग जे-11 (Shenyang J11)
रशिया: एसयू-27 (Russia SU-27)
शेनयांग जे-11 (Shenyang J-11) हे चीनचे असे लढाऊ विमान आहे. जे रशियाच्या सुखोई एसयू-27 "फ्लँकर" (Sukhoi Su-27 “Flanker”) ची नक्कल करून बनवले आहे. सुरुवातीला रशियाने चीनला याची कॉपी बनवण्याची परवानगी दिली होती. मात्र नंतर चीनने त्यात आपली तंत्रज्ञान आणि प्रणाली (एव्हियोनिक्स-avionics) वापरून ते आपल्या गरजेनुसार बदलले. यामुळे रशियाचे नुकसानही झाले आणि हा एक तांत्रिक डोकेदुखी बनला. जे-11बी मॉडेलमध्ये रशियाच्या एसयू-27एसकेचा एअरफ्रेम (airframe) वापरला आहे. परंतु त्याच्या आतील प्रणाली चीनमध्ये बनवल्या आहेत. रेंज, वेग आणि वजनाच्या बाबतीत जे-11 आणि एसयू-27 जवळजवळ एकसारखे आहेत. हे दर्शवते की चीनने प्रथम तंत्रज्ञान घेतले आणि नंतर ते आपल्या गरजेनुसार बदलले.
advertisement

6.
चीन: सीएआयसी-झेड10 (CAIC-Z10)
अमेरिका: एएच-64 अपाचे (U.S: AH 64 Apache)
चीनचे सीएआयसी-झेड10 (CAIC Z-10) अटॅक हेलिकॉप्टर दिसायला अमेरिकेच्या एएच-64 अपाचे (AH-64 Apache) सारखे दिसते आणि अनेक बाबतीत त्याची वैशिष्ट्ये कॉपी करते. झेड-10 ची मारक क्षमता (range) सुमारे 805 किलोमीटर आहे. जी अपाचेच्या 476 किलोमीटर रेंजपेक्षा जास्त आहे. पण अपाचे जास्त वेगाने उडते आणि अधिक घातक आहे. झेड-10 चे डिझाइन केवळ अपाचेसारखेच नाही. तर ते बेल कंपनीच्या (Bell company) नवीन स्टील्थसारख्या इनव्हिक्टस फ्युचर अटॅक रिकॉनिसन्स हेलिकॉप्टरशी (Invictus Future Attack Reconnaissance Helicopter) देखील मिळतेजुळते आहे. त्याची तिरकी टँडम कॉकपिट (tandem cockpit), अरुंद पुढील रचना, खाली बसवलेली गन आणि बाह्य शस्त्रे वाहून नेणारे पंख याला अपाचेसारखेच बनवतात. हे स्पष्टपणे दर्शवते की चीनने पुन्हा एकदा अमेरिकन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपले लष्करी प्लॅटफॉर्म तयार केले आहे. ज्यामुळे मौलिकतेऐवजी कॉपीची प्रतिमा समोर येते.
advertisement

चीनची लष्करी प्रगती जगाला भलेही आश्चर्यचकित करत असेल. परंतु त्यामागे चोरी, सायबर हॅकिंग आणि तांत्रिक नक्कलचे दिसून येते. ड्रोनपासून ते जेट फायटर, टँकपासून ते ट्रान्सपोर्ट प्लेन आणि हेलिकॉप्टरपर्यंत चीनचे प्रत्येक मोठे शस्त्र कुठेतरी दुसऱ्या देशाच्या मूळ तंत्रज्ञानाशी जुळते. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की, चीनची ताकद खरोखरच त्याची स्वतःची आहे की हे एक "कॉपी-पेस्ट साम्राज्य" आहे जे दुसऱ्या देशांच्या मेहनतीवर उभे आहे?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 20, 2025 9:57 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
चीनच्या चोरीचा 'विनाशकारी' मामला; अमेरिका, रशियासह जगाला सर्वात मोठा धोका; भारताचे काय होणार!