दाट जंगलात 914 कोटींचा खजिना,छोट्या गावात सापडले 700 किलो सोनं; मजुराच्या हाती अब्जावधीची संपत्ती
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Gold Mine: अमेझॉनच्या दाट जंगलात लपलेली सेरा पेलाडा ही सोन्याची खाण पुन्हा एकदा अब्जावधींच्या सुवर्णशोधामुळे चर्चेत आली आहे. पण या खजिन्याच्या हव्यासाने जंगल, नद्या आणि स्थानिकांचे जीवन गंभीर धोक्यात आले आहे.
ब्राझीलिया : भारताचा दूरचा मित्र आणि जगाच्या दुसऱ्या टोकाला वसलेला दक्षिण अमेरिकेतील ब्राझील अमेझॉनच्या दाट जंगलांमुळे, अद्भुत वन्यजीवांमुळे आणि रानटी निसर्गामुळे जगभर ओळखला जातो. हा देश सध्या एका अविश्वसनीय खजिन्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. ब्राझीलच्या एका छोट्या गावात सापडलेल्या या प्रचंड खजिन्यामुळे हा देश भविष्यात जगातील सर्वात मोठ्या आर्थिक शक्तींमध्ये गणला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. पण या खजिन्याच्या हव्यासात ब्राझीलचा नैसर्गिक पर्यावरण मात्र गंभीर धोक्यात आला आहे. आणि याच कथेमध्ये एका मजुराचे आयुष्य बदलून टाकणारी अनोखी गोष्ट दडलेली आहे.
advertisement
पाऱ्यामुळे उद्ध्वस्त होत असलेले जंगल
diamonddetailsmcr.co.uk वर प्रकाशित माहितीनुसार ब्राझीलच्या पारा राज्यातील सेरा पेलाडा ही सोन्याची खाण जगप्रसिद्ध आहे. इथे उत्खननासाठी मोठ्या प्रमाणात पाऱ्याचा वापर केला जातो. ज्यामुळे जमिनीचे, पाण्याचे आणि पर्यावरणाचे गंभीर नुकसान होत आहे. सोन्याला इतर खनिजांपासून वेगळे करण्यासाठी वापरला जाणारा हा पारा नद्यांना आणि भूजलसाठ्यांना अत्यंत धोकादायकरीत्या दूषित करतो.
advertisement
सेरा पेलाडा खाण गंभीर आव्हानांशी झुंजत
त्या वेबसाईटनुसार ब्राझीलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सोन्याच्या उत्खनन प्रकल्पाला पुन्हा पूर्ववत सुरू करणे आज अत्यंत कठीण झाले आहे. खनिकांमधील अंतर्गत भांडणे, प्रचंड कर्जबाजारीपणा आणि पर्यावरणीय नियमांची कडक अंमलबजावणी या तिन्ही गोष्टी खाण पुन्हा चालू करण्यास मोठा अडथळा ठरत आहेत. या अमेझॉनमधल्या छोट्याशा गावात आज सोन्याच्या धडपडीपेक्षा चिंता आणि अनिश्चितता अधिक दिसून येते. स्थानिक रहिवाशांचे भविष्य या खाणकामावरच अवलंबून असल्याने त्यांचा मोठा गोंधळ उडाला आहे.
advertisement
एका मजुराची अद्भुत सफर
येथील ज्येष्ठ खनिक चिको ओसोरियो यांनी EFEला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आम्ही सोन्यापासून फक्त तीन मीटर अंतरावर आहोत. ते त्या गुप्त बोगद्याच्या प्रवेशद्वाराकडे पाहत होते. जो त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी जुन्या खाणीच्या जवळ पुन्हा खोदला आहे.
advertisement
ओसोरियो हे इथल्या जिवंत इतिहासाचे प्रतीक मानले जातात. 1982 मध्ये रेडिओवर सोन्याचा शोध लागल्याची घोषणा ऐकताच ते येथे धावत आले. तेव्हा हजारो माणसे खाणीच्या उभ्या भिंतींवरून सोन्याच्या शोधात धावत होती. फावड्याच्या मदतीने 50 किलो वजनाचे दगडांनी भरलेले पोते खांद्यावर घेत उंच खडकासारख्या पायर्या चढत हे खनिक धोकादायक प्रवास सुरू करत. थोडा चमकदार दगड सापडेल या आशेने सर्वजण कोल्हूकडे जात.
advertisement
खोदता खोदता मिळाले तब्बल 700 किलो सोने
आज मात्र ती खाण 150 मीटरपेक्षा अधिक खोल पाण्याने भरून एक मोठे तलावच बनली आहे. पण ओसोरियो नशिबवान होते. त्यांनी आपल्या आयुष्यात तब्बल 700 किलो सोने उकरले. आजच्या दराने हे सोने सुमारे 914 कोटी रुपये मूल्याचे होते. त्यांनी काही पैसे बँकेत ठेवले, काही पैशांत दोन विमानं विकत घेतली, तर उरलेले उपकरणे खरेदीसाठी वापरले.
advertisement
खाणीचे बंद होणे आणि बँकेचे दिवाळे
1992 मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने ही खाण बंद केली. त्याचवेळी सोन्याचे उत्खनन आधीच मंदावले होते. पण ज्याठिकाणी ओसोरियोने आपली बचत ठेवली होती ती बँकच दिवाळखोर ठरली! आणि त्याच्या लाखो रुपयांच्या मेहनतीचा मोबदला म्हणून उरले ते फक्त एक खोल गड्ढा आणि काही खराब अवस्थेतील मशीनरी.
खाण मजुरांचे कठीण वास्तव
ओसोरियोप्रमाणे अनेक माजी खनिक आजही सेरा पेलाडामध्येच राहतात. बहुतेकांचा दिवस सहकारी समितीच्या ऑफिसमध्ये डोमिनोज खेळत, काही चमत्कार होईल या आशेने वाट पाहत जातो. पण आशा संपत चालली आहे. त्यामुळे काही खनिकांनी गुप्तपणे पुन्हा खाणकाम सुरू केले आहे. पारा वापरून सोने वेगळे करण्याची जुनाट पद्धत वापरली जात असल्याने पर्यावरणीय धोका पुन्हा प्रचंड वाढला आहे.
दर आठवड्याला मिळतात 200 ग्रॅम सोन्याचे तुकडे
अवैध खाणकाम रोखण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू असतानाही, 65 वर्षीय व्यापारी कार्लोस ऑरेलियो यांनी EFE ला सांगितले की त्यांना आठवड्याला साधारण 200 ग्रॅम सोन्याचे तुकडे मिळत आहेत. ते ते एका छोट्या प्लास्टिकच्या डब्यात ठेवतात. जरी हे प्रमाण पूर्वीच्या पर्वताएवढ्या सोन्याशी तुलना करता काहीच नसले, तरी या भागातील सोन्याची खाण अजून जिवंत असल्याचा तो एक मोठा पुरावा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 4:31 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
दाट जंगलात 914 कोटींचा खजिना,छोट्या गावात सापडले 700 किलो सोनं; मजुराच्या हाती अब्जावधीची संपत्ती


