भारताचा नवा पॉवर गेम, काबूलमध्ये पुन्हा एन्ट्री; TAPI प्रोजेक्टने तालिबान सरकारही हलली, लगेच दिले ‘रिटर्न गिफ्ट’

Last Updated:

India Reopening Embassy In Kabul: भारताने काबूलमध्ये आपला दूतावास पुन्हा सुरू करत अफगाणिस्तानाशी संबंध मजबूत करण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या निर्णयानंतर TAPI गॅस पाइपलाइन प्रकल्पालाही नवसंजीवनी मिळाली असून, आशियातील रणनीतिक समीकरणे नव्याने लिहिली जात आहेत.

News18
News18
काबूल/ नवी दिल्ली : भारत आणि अफगाणिस्तान यांच्या संबंधांमध्ये पुन्हा एकदा नवा जीव आणि नवी दिशा आली आहे. मंगळवारी भारताने काबूलमधील आपल्या तांत्रिक मिशनला दूतावासाचा दर्जा (Embassy Status) दिला आहे. या निर्णयामुळे हे स्पष्ट झाले आहे की, भारत आता अफगाणिस्तानमध्ये आपली उपस्थिती आणि भूमिका आणखी मजबूत करण्याच्या तयारीत आहे.
advertisement
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, हा निर्णय दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण आणि सहकार्यपूर्ण नातेसंबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने घेतला आहे. आणि जसेच भारताने हा पाऊल उचलले, तसाच तालिबान सरकारनेही तत्काळ प्रत्युत्तर म्हणून महत्त्वाचे पाऊल उचलले. अफगाणिस्तानचे उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर स्वतः TAPI गॅस पाइपलाइन प्रकल्पाच्या स्थळावर पोहोचले.
advertisement
हाच तो TAPI प्रोजेक्ट Turkmenistan-Afghanistan-Pakistan-India Pipeline जो या चार देशांना जोडणारा एक विशाल गॅस मार्ग आहे. या प्रकल्पामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेत आमूलाग्र बदल घडणार आहे.
भारतासाठी TAPI प्रोजेक्ट का ठरणार ‘गेम चेंजर’?
advertisement
भारताला या प्रकल्पातून नेमका काय फायदा होणार? प्रत्यक्षात TAPI प्रोजेक्ट हा भारतासाठी ऊर्जा क्षेत्रातील क्रांतीसमान (Game Changer) ठरणार आहे. या पाइपलाइनद्वारे तुर्कमेनिस्तानची नैसर्गिक गॅस थेट भारतापर्यंत पोहोचेल, ज्यामुळे देशाच्या वाढत्या ऊर्जा मागणीची पूर्तता होईल. ऊर्जा निर्मिती वाढेल, उद्योगांना इंधन मिळेल आणि घरगुती गॅस पुरवठाही अधिक सोपा होईल.
advertisement
अफगाणिस्तानचे उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर यांनी या प्रसंगी म्हटलं की- हा प्रकल्प फक्त पाइपलाइन नाही, तर विश्वास आणि प्रादेशिक सहकार्याचा पूल आहे. या प्रकल्पामुळे भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये रणनीतिक मैत्री, व्यापार आणि विकासाचे नवीन दरवाजे उघडतील.
advertisement
तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष गुर्बांगुली बेर्दिमुहम्मेदोव यांनीही सांगितले की- TAPI हा आमच्या देशाच्या प्राथमिक प्रकल्पांपैकी एक आहे, आणि आम्ही त्याची वेळेत पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यांच्या मते, हा प्रकल्प संपूर्ण प्रदेशासाठी आर्थिक स्थैर्य आणि विकासाचा नवा अध्याय ठरेल.
भारताचा दूतावास उघडणे का आहे खास
advertisement
काबूलमध्ये भारताने पुन्हा दूतावास सुरू करणे ही केवळ औपचारिक गोष्ट नाही. याचा अर्थ असा आहे की आता भारत अफगाणिस्तानमध्ये थेट विकास, मानवी मदत आणि क्षमता-विकासाच्या प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकेल.
दूतावासाद्वारे भारत अफगाण समाजाच्या प्राथमिक गरजांनुसार मदत आणि सहयोग देऊ शकेल तसेच दोन्ही देशांमधील राजकीय आणि आर्थिक संपर्क अधिक मजबूत करू शकेल. हा निर्णय भारताच्या कूटनीतिक आणि रणनीतिक उपस्थितीला अधिक स्थैर्य देणारा ठरला आहे.
TAPI प्रोजेक्टची सध्याची स्थिती
अफगाणिस्तानमधील TOLO News या न्यूज पोर्टलनुसार, TAPI पाइपलाइनचे काम अफगाण भूमीवर गेल्या वर्षापासून सुरू आहे. अफगाण सरकारनुसार, आतापर्यंत 14 किलोमीटर पाइपलाइनचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि आणखी 70 किलोमीटरचा भाग तयार करण्याची तयारी सुरू आहे. तुर्कमेनिस्तानकडून मोठ्या प्रमाणात पाइपलाइन साहित्य अफगाणिस्तानला पाठवण्यात आले आहे.
अफगाण अधिकारी हामदुल्लाह फितरत यांनी सांगितले की- जशी पाइपलाइन हेरात शहरापर्यंत पोहोचेल तसा अफगाणिस्तानला थेट तुर्कमेन गॅसचा पुरवठा सुरू होईल. यामुळे स्थानिक लोकांना गॅसचा पुरवठा सहज आणि स्वस्त दरात मिळेल.
भारताला होणारा थेट फायदा
सरळ सांगायचं झालं, तर TAPI प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर भारताला ऊर्जा सुरक्षा (Energy Security) मिळेल. देशातील वाढत्या वीज आणि गॅसच्या मागणीची पूर्तता सुलभ होईल. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे प्रादेशिक सहकार्य बळकट होईल आणि अफगाणिस्तानतुर्कमेनिस्तानमार्गे भारताचे व्यवसाय, उद्योग आणि व्यापार संबंध अधिक सशक्त होतील.
भारताला या प्रकल्पातून फक्त गॅसच नाही, तर रणनीतिक आणि आर्थिक दोन्ही स्तरांवर मोठे फायदे होतील. तज्ज्ञांच्या मते, हा प्रकल्प केवळ भारत आणि अफगाणिस्तानसाठीच नाही; तर संपूर्ण दक्षिण आशिया आणि मध्य आशियासाठी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.
भारत या माध्यमातून आपली उपस्थिती स्पष्टपणे दाखवत आहे. एकाच वेळी ऊर्जा सुरक्षा, प्रादेशिक सहकार्य आणि राजनैतिक प्रभाव या तीन आघाड्यांवर भारताने मजबूत पाऊल टाकले आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
भारताचा नवा पॉवर गेम, काबूलमध्ये पुन्हा एन्ट्री; TAPI प्रोजेक्टने तालिबान सरकारही हलली, लगेच दिले ‘रिटर्न गिफ्ट’
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement