गुरू,मंगळ, शुक्रानंतर पृथ्वीवर हल्ला होणार; अगदी थोडा वेळ शिल्लक, थरकाप उडवणारा इशारा, शास्त्रज्ञही घाबरले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
पृथ्वीच्या दिशेने अविश्वसनीय वेगाने येणाऱ्या 3I/ATLAS नावाच्या अंतराळीय वस्तूमुळे संशोधकांमध्ये खळबळ उडाली आहे. काही शास्त्रज्ञांचा दावा आहे की हे नैसर्गिक वस्तू नसून एलियन टोही यंत्र असू शकते, जे नोव्हेंबरमध्ये मोठा धोका निर्माण करू शकते.
वॉशिंग्टन: बुल्गेरियाची ख्यातनाम भविष्यवेत्ती बाबा वांगा हिने असा दावा केला होता की- मानवजातीचा परग्रहवासीयांशी संपर्क 2025 मध्ये होईल. पण अलीकडील शास्त्रीय अहवाल काहीतरी अधिक धक्कादायक आणि वेगळंच सांगत आहेत. आणि तो संपर्क मैत्रीपूर्ण नसून शत्रुत्वासहित असू शकतो.
16 जुलै 2025 रोजी arXiv या प्रीप्रिंट सायंटिफिक सर्व्हरवर प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार (ज्याचा उल्लेख New York Post आणि South West News Service या संस्थांनी केला आहे) शास्त्रज्ञांच्या एका टीमने इशारा दिला आहे की- पृथ्वीच्या दिशेने एक परग्रहवासीय अंतराळ यान येत आहे. आणि ते नोव्हेंबरमध्ये आक्रमण करणार असल्याची शक्यता आहे.
advertisement
ही रहस्यमय वस्तू 3I/ATLAS या नावाने ओळखली जात आहे. तिचा शोध 1 जुलै रोजी प्रथम लागला होता. ही वस्तू सध्या तासाला 1,30,000 मैलांच्या वेगाने सूर्याच्या दिशेने झेपावत आहे. केवळ शोध लागल्यानंतर एकाच दिवसात खगोलशास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं की ही वस्तू आपल्या सौरमालेबाहेरून आलेली आहे.
सुरुवातीला वैज्ञानिकांनी 3I/ATLAS ही एक धूमकेतू असावी असा अंदाज व्यक्त केला होता. तिचा आकार जवळपास 15 मैल म्हणजे मॅनहॅटन शहरापेक्षाही मोठा आहे. मात्र इनीशिएटिव्ह फॉर इंटरस्टेलर स्टडीज या संस्थेचे संशोधक अवी लोएब, अॅडम हिबर्ड आणि अॅडम क्रोल यांच्या मते ही वस्तू नैसर्गिक नसून, एखाद्या परग्रहवासीय टोही तंत्रज्ञानाचा भाग असू शकतो.
advertisement
हावर्ड विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ अवी लोएब यांनी 2017 मध्ये आलेली Oumuamua ही वस्तू परग्रहवासीय टोही यंत्र असू शकते, असा वादग्रस्त दावा केला होता. त्यांनी या 3I/ATLAS वस्तूबाबत मत मांडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या वस्तूच्या गती व मार्गात असलेल्या असामान्य वैशिष्ट्यांमुळे ती बुद्धिमान आणि कृत्रिम मूळाची असण्याची शक्यता वर्तवता येते.
एका ब्लॉगपोस्टमध्ये लोएब यांनी नमूद केलं आहे की, 3I/ATLAS सौरमालेतून जाण्याच्या मार्गात ती गुरू, मंगळ आणि शुक्राच्या अगदी जवळून जाईल. त्यामुळे परग्रहवासीयांना या ग्रहांवर त्यांची टोही उपकरणं (surveillance gadgets) गुप्तपणे उतरवण्याची ही एक आदर्श संधी आहे, असं ते म्हणतात.
advertisement
या सगळ्यापेक्षाही जास्त चिंताजनक गोष्ट म्हणजे नोव्हेंबर महिन्यात जेव्हा ही वस्तू सूर्याच्या सर्वात जवळ (perihelion) पोहोचेल. तेव्हा ती काही काळासाठी पृथ्वीवरील दुर्बिणींना दिसेनाशी होईल. लोएब यांच्या मते, हे जाणीवपूर्वक केलं गेलेलं 'गुप्त' पाऊल असू शकतं; जेणेकरून पृथ्वीच्या निरीक्षण उपकरणांपासून बचाव करता येईल. आणि कदाचित त्याच काळात पृथ्वीच्या दिशेने एखादी परग्रहवी यंत्रणा पाठवली जाईल.
advertisement
जर 3I/ATLAS हे वस्तुतः परग्रहवासीयांचे तंत्रज्ञान असेल तर हे "डार्क फॉरेस्ट हायपोथेसिस" (Dark Forest Hypothesis) ला बळकटी देणारे ठरेल. या सिद्धांतानुसार बुद्धिमान परग्रह संस्कृती स्वतःला लपवून ठेवतात. कारण त्यांना इतर संभाव्य धोकादायक जीवसृष्टींपासून स्वतःचे संरक्षण करायचे असते.
लोएब यांच्या इशाऱ्यानुसार, ही घडामोड केवळ एक निरीक्षण मोहीम नसेल, तर ती एखाद्या संभाव्य आक्रमणापूर्वीची तयारी असू शकते. त्यामुळे त्यांनी "संरक्षणात्मक उपाययोजना" करण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
नोव्हेंबरमध्ये जेव्हा 3I/ATLAS सूर्याजवळ पोहोचेल, तेव्हा ती वस्तू खरोखरच एक धूमकेतू आहे की एक परग्रहवासीय Trojan horse हे स्पष्ट होईल. तोवर वैज्ञानिक समुदाय आणि सामान्य लोक या रहस्यमय अंतराळ अभ्यागताकडे ताटकळून पाहत राहणार हे नक्की.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 28, 2025 6:35 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
गुरू,मंगळ, शुक्रानंतर पृथ्वीवर हल्ला होणार; अगदी थोडा वेळ शिल्लक, थरकाप उडवणारा इशारा, शास्त्रज्ञही घाबरले