US Attack On Iran : इराणवर हल्ला केल्यानंतर अमेरिका स्वत:च टेन्शनमध्ये, उडाली झोप, जगानं नेमकी कशी घेतली धास्ती
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
US Attack On Iran :अमेरिकेने इराणवर हल्ला करून त्यांचे अणूबॉम्ब स्वप्न उद्ध्वस्त केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी यशाची घोषणा केली. इस्रायलनेही इराणवर हल्ले केले. इराणने होर्मुझ जलमार्ग बंद करण्याची धमकी दिली.
US Attack On Iran : इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेनं उडी घेतली आहे. अमेरिकेच्या विमानांनी चक्क 25 मिनिटांत सारं काही उद्ध्वस्त केलं आहे. अमेरिकेची बॉम्बर विमानं हल्ला करुन पुन्हा देशात परतली आणि पुढच्या काही वेळातच अमेरिकेची झोप उडाली. अमेरिकेनं हाय अलर्ट जारी केला आहे. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरात खळबळ उडाली. दुसरीकडे, अमेरिकेने अचानक 'हाय अलर्ट' जारी केला. अमेरिकनं अधिकाऱ्यांनी दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट दिला आहे.
होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटने इराण समर्थक दहशतवादी अमेरिकेवर हल्ला करू शकतात, तसंच सायबर हल्ल्याचीही शक्यता आहे. दरम्यान, अमेरिकेने जॉर्डनपासून कुवेतपर्यंतच्या देशांना सतर्क केले आहे. या हल्ल्यानंतर जगभराराने कशी धास्ती घेतली आहे आणि महत्त्वाचे 10 अपडेट्स कोणते आहेत ते समजून घेऊया.
डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर एक पोस्ट शेअर केली. रविवारी आम्हाला मोठं यश मिळालं. आम्ही इराणचं अणूबॉम्बचं स्वप्न बेचिराख केलं, त्यांच्या हातात जर तो असता तर त्यांनी तो वापरला असता पण, नेहमीप्रमाणे काँग्रेसने याला विरोध केला. काल रात्री आमच्या अविश्वसनीय लष्करी जवानांनी जे अद्भुत काम केले, त्याबद्दल त्यांचे आभार. हे खरोखरच विशेष होतं, असं ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
advertisement
इराणच्या संसदेने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (समुद्री मार्ग) बंद करण्याची घोषणा केल्याने खळबळ उडाली. जर होर्मुझ जलमार्ग बंद केला तर त्याचे परिणाम गंभीर होतील असा इशारा अमेरिकेनं दिला होता. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी चीनला होर्मुझ समुद्री मार्गाच्या मुद्द्यावर इराणवर दबाव आणण्यास सांगितलं होतं. होर्मुझ समुद्री मार्ग बंद होण्यास चीनने सर्वात आधी विरोध करावा, असे अमेरिकेने म्हटले आहे.
advertisement
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले, "आम्ही इराणला अणुऊर्जा प्रकल्प चालवण्याची परवानगी देऊ शकतो, त्यांना युरेनियम तयार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. इराणला ऊर्जेची अडचण येऊ नये म्हणून आम्ही इंधनाचा पुरवठा करू शकतो, जेणेकरून ते शस्त्रे बनवण्याच्या दिशेने पुढे जाऊ नयेत."
advertisement
इस्रायलचे इराणमधील लष्करी ठिकाणांवर पुन्हा हल्ले: इस्रायली सैन्याने इराणमधील डझनभर लष्करी ठिकाणांवर पुन्हा हल्ला केला. यात क्षेपणास्त्र आणि ड्रोन ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. 'इमाम हुसैन स्ट्रॅटेजिक मिसाईल हेडक्वार्टर्स'सह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचा नाश केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. अमेरिकेनंतर इस्रायलने इराणच्या यज्द प्रांतावर मोठा हल्ला केला, ज्यात रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे सात कमांडर ठार झाले. याव्यतिरिक्त दोन सैनिकही मारले गेले. इस्रायलने दोन लष्करी तळांना लक्ष्य करून हे हल्ले केले होते.
advertisement
मुस्लिम देश दोन गटांमध्ये विभागले जाताना दिसत आहेत. इराण एकटा पडला असून, तुर्की आणि पाकिस्तान पाठिंबा देण्याचे नाटक करत आहेत. आखाती देशांनी इराणपासून पूर्णपणे अंतर ठेवले आहे. चीन आणि रशियाने अमेरिकन हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर सहयोगी सिनेटर लिंडसे ग्राहम म्हणाले की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू कोणत्याही परिस्थितीत इराणमध्ये सत्तापालट करू इच्छितात. ग्राहम यांनी सांगितले की, "मी नुकतीच नेतन्याहूंशी बोललो असून, त्यांनी याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ते म्हणाले, आम्ही खामेनेई शासनाला सहन करू शकत नाही. एकतर त्यांनी आपले वर्तन बदलावे किंवा सरकार बदलावे."
advertisement
आतापर्यंत दूर राहिलेले युरोपीय देशही इस्रायलच्या बाजूने उभे राहिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्ज यांनी एका आपत्कालीन बैठकीनंतर सांगितले की, "आम्ही या प्रकरणात स्पष्ट आहोत की इराणकडे अणुबॉम्ब नसावा. आम्ही इस्रायलच्या सुरक्षेला पाठिंबा देतो. इराणने चर्चेच्या टेबलावर यावे."
advertisement
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरगची आज (सोमवार) रशियाला रवाना होणार आहेत, जिथे ते राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. इस्रायलसोबतच्या वाढत्या तणावादरम्यान, इराणच्या विनंतीवरून UNSC ची आपत्कालीन बैठक झाली, ज्यात पाकिस्तान, चीन आणि रशियाने उघडपणे इराणला पाठिंबा दिला.
इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, अमेरिकेने जे केले त्याचे प्रत्युत्तर नक्कीच दिले पाहिजे. "आम्ही नेहमीच म्हटले आहे की आम्ही आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत चर्चा करण्यास आणि वाटाघाटी करण्यास तयार आहोत, परंतु तर्क स्वीकारण्याऐवजी, दुसऱ्या बाजूने इराणी राष्ट्राच्या शरणागतीची मागणी केली आहे. हे आम्हाला मान्य नाही," असे ते म्हणाले. इराण-समर्थित हिजबुल्ला संघटनेने म्हटले आहे की, इराणवरील हल्ला केवळ एक लष्करी कारवाई नाही, तर संपूर्ण प्रादेशिक स्थैर्याला आव्हान देणारे पाऊल आहे. अमेरिकेचा खरा चेहरा समोर आला आहे.
इराण-इस्रायल युद्धावर इस्रायली लष्करप्रमुख झामीर यांनी घोषणा केली की, "इराणवरील हल्ले थांबणार नाहीत, जोपर्यंत गरज असेल तोपर्यंत कारवाई सुरू राहील. अजूनही अनेक उद्दिष्टे बाकी आहेत. अनेक लक्ष्ये पूर्ण करायची आहेत." यानंतरच इस्रायलने इराणवर जोरदार हल्ले केले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 23, 2025 7:37 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
US Attack On Iran : इराणवर हल्ला केल्यानंतर अमेरिका स्वत:च टेन्शनमध्ये, उडाली झोप, जगानं नेमकी कशी घेतली धास्ती


