Iran US Conflict: इराणच्या धास्तीने महासत्ता झुकली? अमेरिकेची सर्वात मोठी युद्धनौका होर्मुझ सोडून का पळाली?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Iran War: मध्यपूर्वेतील (Middle East) तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकन नौदलाने आपले सर्वात मोठे आणि आधुनिक एअरक्राफ्ट कॅरियर 'USS जेराल्ड आर. फोर्ड' याला तातडीने होर्मुझ सामुद्रधुनीतून इतर ठिकाणी हलवण्याचे आदेश जारी केले आहेत.
वॉशिंग्टन: मध्यपूर्वेतील (Middle East) तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकन नौदलाने आपले सर्वात मोठे आणि आधुनिक एअरक्राफ्ट कॅरियर 'USS जेराल्ड आर. फोर्ड' याला तातडीने होर्मुझ सामुद्रधुनीतून इतर ठिकाणी हलवण्याचे आदेश जारी केले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने नियंत्रण असून युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने वाहतूक बंद केली आहे. त्यानंतर अमेरिकेकडून इराणला धमकीदेखील दिली होती. मात्र, या सगळ्या घडामोडीत अमेरिकेच्या युद्धनौकेने माघार घेतल्याचं दिसून आलं आहे. इराणच्या भीतीनं हे पाऊल उचलण्यात आली का, याची चर्चा सुरू झाली आहे.
अमेरिकेची सर्वात मोठी युद्धनौका 'USS जेराल्ड आर. फोर्ड' ला माघारी पाठवण्यात आले आहे. या युद्धनौकेला ग्रीसच्या 'सौदा बे' नेव्हल बेसवर जाण्याचे आदेश दिले आहेत. इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षात ही युद्धनौका अमेरिकेचे सर्वात मोठे शस्त्र मानली जात होती, मात्र आता ती युद्धभूमी सोडून गेल्याने जागतिक स्तरावर चर्चांना उधाण आले आहे.
हल्ला की अपघात? पेंटागनचे स्पष्टीकरण काय?
advertisement
पेंटागनने अधिकृतपणे सांगितले आहे की, ही युद्धनौका केवळ देखभाल आणि दुरुस्तीसाठी ग्रीसला पाठवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात या जहाजाच्या लॉन्ड्री एरियामध्ये अचानक आग लागली होती. या आगीत काही सैनिकांना इजा झाली असून जहाजाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील एक आठवडा या जहाजाची दुरुस्ती ग्रीसमध्ये केली जाणार आहे.
इराणचा संबंध आहे का?
advertisement
इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) होणारा तेल आणि वायूचा पुरवठा रोखण्यासाठी हल्ले तीव्र केले आहेत. अशा वेळी ही युद्धनौका समुद्रधानुतून माघारी धाडण्यात आली आहे. अनेक संरक्षण तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, जहाजावर लागलेली ही आग खरोखरच अपघात होता की इराणने केलेला एखादा छुपा हल्ला? इराणने यापूर्वीच अमेरिकेच्या मोठ्या युद्धनौकांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. मात्र, पेंटागनने हे सर्व दावे फेटाळून लावत ही आग कोणत्याही लष्करी कारवाईमुळे लागलेली नाही, असे स्पष्ट केले आहे.
advertisement
जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम?
USS जेराल्ड आर. फोर्ड हे जहाज पूर्णपणे ऑपरेशनल असल्याचे अमेरिकेने म्हटले असले तरी, या जहाजाच्या अनुपस्थितीत होर्मुज सामुद्रधुनीतील सुरक्षा कमकुवत होण्याची भीती आहे. इराणने या भागातील जहाजांवर हल्ले वाढवल्यास जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष या महाकाय युद्धनौकेच्या हालचालींकडे लागले आहे.
Location :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
Mar 19, 2026 1:51 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran US Conflict: इराणच्या धास्तीने महासत्ता झुकली? अमेरिकेची सर्वात मोठी युद्धनौका होर्मुझ सोडून का पळाली?









