पृथ्वीच्या शेजारच्या ताऱ्याजवळ गूढ ग्रह, नासाचा थरारक शोध; शास्त्रज्ञही थक्क, नेमकं आहे तरी काय?

Last Updated:

New Planet Detected: पृथ्वीपासून अवघ्या 4 प्रकाशवर्षांवर नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपने सूर्यासारख्या ताऱ्याजवळ एक नवा ग्रह शोधला आहे. हा ग्रह राहण्यायोग्य नसला तरी आपल्या अवकाश संशोधनात तो ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

News18
News18
नवी दिल्ली: पृथ्वीपासून फक्त 4 प्रकाशवर्ष (light year) दूर एक मोठी खगोलशास्त्रीय घटना समोर आली आहे. नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपने (JWST) अल्फा सेंटॉरी ए (Alpha Centauri A) ताऱ्याजवळ एक नवीन ग्रह शोधला आहे. हा तारा आपल्या सूर्यमालेच्या सर्वात जवळचा आणि सूर्यासारख्या ताऱ्यांपैकी एक आहे. ही शोध केवळ विज्ञानासाठीच नाही, तर मानवाच्या वैश्विक भविष्यासाठीही खूप महत्त्वाची मानली जात आहे.
JWST ने आपल्या मिड-इन्फ्रारेड इन्स्ट्रुमेंट (MIRI) चा वापर करून ही शोध लावली. या प्रक्रियेत एका खास कोरोनोग्राफिक मास्कचा (coronagraphic mask) वापर केला गेला. ज्यामुळे अल्फा सेंटॉरीची (Alpha Centauri) तीव्र चमक बाजूला सारता आली. त्यानंतर तिथे एक अत्यंत धूसर ग्रह दिसला जो त्याच्या ताऱ्यापेक्षा सुमारे 10,000 पट कमी चमकदार आहे.
इथे जीवन असू शकते का?
हा ग्रह अल्फा सेंटॉरी ए च्या ‘राहण्यायोग्य क्षेत्रात’ (Habitable Zone) आहे. हे असे क्षेत्र असते जिथे तापमान असे असते की तिथे पाणी द्रवरूपात राहू शकते. पण शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हा एक गॅस जायंट (Gas Giant) आहे. म्हणजेच त्याचे वातावरण बहुतेक वायूंचे (gases) बनलेले आहे. त्यामुळे येथे आपल्या पृथ्वीवरील जीवनासारखे जीवन असू शकत नाही.
advertisement
जरी हा ग्रह राहण्यायोग्य नसला तरी त्याचा शोध खूप महत्त्वाची आहे. पहिल्यांदाच एखाद्या सूर्यासारख्या ताऱ्याजवळ अशा प्रकारच्या ग्रहाची प्रतिमा काढण्यात आली आहे. हा ग्रह त्याच्या ताऱ्यापासून केवळ दोन खगोलशास्त्रीय एकक (AU) दूर आहे. हे अंतर पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या फक्त दुप्पट आहे.
नासाच्या एक्सोप्लॅनेट सायन्स इन्स्टिट्यूटचे (Exoplanet Science Institute) संचालक चार्ल्स बेइचमन यांनी म्हटले, हे ग्रह आपल्याला खूप जवळ असल्याने अशा कोणत्याही ग्रहाची शोध आपल्याला दुसऱ्या सूर्यमाला समजून घेण्याची सर्वोत्तम संधी देते.
advertisement
अल्फा सेंटॉरी स्टार सिस्टम
अल्फा सेंटॉरी सिस्टीममध्ये आधीच दोन ग्रह आहेत. पण ते दोन्ही प्रॉक्सिमा सेंटॉरी (Proxima Centauri) नावाच्या रेड ड्वार्फ (Red Dwarf) ताऱ्याभोवती आहेत. हा नवीन ग्रह अल्फा सेंटॉरी ए जवळ सापडला आहे जो सूर्यासारखा आहे.
नंतरच्या निरीक्षणात हा ग्रह पुन्हा दिसला नाही. याचे एक कारण असे असू शकते की तो ताऱ्याच्या खूप जवळ होता आणि कॅमेऱ्याच्या कक्षेतून बाहेर गेला. पण शास्त्रज्ञांना आशा आहे की 2027 मध्ये लॉन्च होणाऱ्या नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलीस्कोप (Nancy Grace Roman Space Telescope) त्याला पुन्हा शोधू शकेल.
advertisement
कॅलटेकचे (Caltech) संशोधक अनिकेत सांघी यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले. ते म्हणाले, जर हा ग्रह खरंच तिथे असेल, तर दोन ताऱ्यांच्या अस्थिर वातावरणात ग्रह कसे तयार होतात आणि टिकतात या विचाराला हे आव्हान देते.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
पृथ्वीच्या शेजारच्या ताऱ्याजवळ गूढ ग्रह, नासाचा थरारक शोध; शास्त्रज्ञही थक्क, नेमकं आहे तरी काय?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement