परिस्थिती हाताबाहेर गेली, सर्वात जास्त डिमांड असलेल्या गोष्टीवर घातली बंदी; सुरू झाली चोरी, तस्करी आणि काळाबाजार…

Last Updated:

North Korea Kim Jong-un: उत्तर कोरियात सर्वाधिक मागणी असलेल्या कंडोमवर किम जोंग उन यांनी घातलेल्या बंदीनंतर देशभरात चोरी, तस्करी आणि काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कुटुंब नियोजन आणि लैंगिक शिक्षणावरची कडक बंदीमुळे देशातील तरुणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.

News18
News18
प्यॉंगयांग: उत्तर कोरियामध्ये कंडोमचे उत्पादन, खरेदी-विक्री आणि वितरण यावर पूर्णतः बंदी आहे. देशाचे सर्वोच्च नेता किम जोंग उन यांनी कंडोम निर्माणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. देशात जरी कंडोम स्वतःकडे ठेवणे किंवा वापरणे कायदेशीर मानले गेले तरी ते मिळवणे अत्यंत कठीण आहे. यामुळे देशभरात कंडोमची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते.
advertisement
किम जोंग उन यांनी देशातील जन्मदर वाढवण्यासाठी कुटुंब नियोजनाशी संबंधित सर्व पद्धतींवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे कंडोमच्या उत्पादन आणि विक्रीही देशात पूर्णपणे बंदी आहे. मिररच्या अहवालानुसार उत्तर कोरियाचे नेतृत्व उच्च जन्मदराला प्रोत्साहन देत आहे. आणि किम यांच्या धोरणाला विरोध करण्याची हिंमत कोणालाही नसल्याचे सांगितले जाते. कमी होत चाललेल्या जन्मदराला आळा घालण्याच्या प्रयत्नात सरकारने गर्भपातावरही बंदी लागू केली आहे.
advertisement
देशात कंडोमची मोठी मागणी असल्याने अनेक लोक चीनसारख्या शेजारी देशांना भेट देताना कंडोम भेटवस्तू म्हणून घेऊन येतात. तस्कर मात्र हे कंडोम अवैध देहव्यापार करणाऱ्या रॅकेट्सना अधिक किमतीत विकून मोठा नफा मिळवतात. जगभरात सहज उपलब्ध असलेल्या कंडोमवर उत्तर कोरियात कठोर निर्बंध आहेत. रेडिओ फ्री एशियाच्या माहितीनुसार, कंडोमना सीमाशुल्क पोस्टवरून देशात प्रवेश करण्याची परवानगी दिली जात नाही.
advertisement
गार्डियनच्या एका अहवालात उत्तर कोरियातून पळून गेलेल्या एका व्यक्तीची कहाणी दिली आहे. तो व्यक्ती प्योंगयांगमध्ये वाढला, तरी त्याने आपल्या देशात "कंडोम" हा शब्दसुद्धा कधी ऐकला नव्हता. दक्षिण कोरियात स्थलांतर केल्यानंतर काही काळ त्याला कंडोम म्हणजे काय, त्यांचा उपयोग काय आणि ते कुठे मिळतात याची अजिबात माहिती नव्हती. परदेशात गेल्यावर त्याला आश्चर्य वाटले की इतर देशांमध्ये शाळांमध्येच लैंगिक शिक्षण दिले जाते आणि विद्यार्थ्यांना वर्गातच कंडोम वापरण्याचे प्रशिक्षण देखील केले जाते.
advertisement
उत्तर कोरियातील लोक विवाह करतात, लैंगिक संबंध ठेवतात आणि कुटुंबही वाढवतात. मात्र देशात लैंगिक शिक्षणाचा कोणताही औपचारिक कार्यक्रम नाही. लैंगिकतेबद्दल चर्चा करणे, पोर्नोग्राफी पाहणे किंवा परिवार नियोजनाबद्दल माहिती देणे हे सर्व बेकायदेशीर मानले जाते. त्यामुळे मुला-मुलींना सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे काय, कंडोमचा उपयोग कसा करतात किंवा तो कशासाठी असतो याची कोणतीही माहिती दिली जात नाही. किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिक जिज्ञासा वाढू लागली तरी शाळा किंवा समाजात याबाबत चर्चा होण्यास परवानगी नसल्याने त्यांच्याकडे कोणतेही योग्य मार्गदर्शन नसते. परिणामी देशात कंडोम मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे. आणि लैंगिक आरोग्याबाबतची अज्ञान गंभीर स्वरूप धारण करते.
advertisement
view comments
मराठी बातम्या/विदेश/
परिस्थिती हाताबाहेर गेली, सर्वात जास्त डिमांड असलेल्या गोष्टीवर घातली बंदी; सुरू झाली चोरी, तस्करी आणि काळाबाजार…
Next Article
advertisement
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement