एक सही केली अन् 310 कोटींचं दान दिले, कारण ऐकून थक्क व्हाल; रक्कम कुणाला दिली आणि का?

Last Updated:

Donated 42 Million: अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या माजी पत्नी मॅकेंझी स्कॉट पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी शिक्षणासाठी तब्बल 42 दशलक्ष डॉलर (310 कोटी रुपये) दान देत जगाला चकित केले आहे.

News18
News18
नवी दिल्ली : अमेझॉन संस्थापक जेफ बेझोस यांच्या माजी पत्नी आणि अब्जाधीश समाजसेविका मॅकेंझी स्कॉट यांनी पुन्हा एकदा आपल्या उदारतेने जगाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी अलीकडेच शिक्षण क्षेत्रासाठी तब्बल 42 दशलक्ष डॉलर (सुमारे 310 कोटी रुपये) इतकी मोठी देणगी दिली आहे.
advertisement
आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी
मॅकेंझी स्कॉट यांनी ही देणगी त्यांच्या Yield Giving या स्वयंसेवी संस्थेमार्फत अमेरिकेतील सॅन राफेल (San Rafael) येथील गैर-नफा संस्था 10,000 Degrees ला दिली आहे. ही संस्था अशा विद्यार्थ्यांना मदत करते जे त्यांच्या कुटुंबातील पहिले कॉलेज जाणारे विद्यार्थी आहेत. विशेषतः अश्वेत (Black) आणि अल्पसंख्यांक समुदायांतील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होतो.
advertisement
फॉर्च्युन’ (Fortune) मासिकाच्या अहवालानुसार, ही रक्कम या संस्थेला मिळालेली आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे. स्कॉट यांचा हा निर्णय शिक्षणातील समान संधी आणि सामाजिक समतेच्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जात आहे.
लेखिकेपासून अब्जाधीशापर्यंतचा प्रवास
advertisement
मॅकेंझी स्कॉट फक्त समाजसेविका नाहीत, तर एक प्रतिभावान लेखिका देखील आहेत. त्यांचा जन्म 1970 साली कॅलिफोर्निया (California) येथे झाला. त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदवी घेतली. जिथे त्यांना नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका टोनी मॉरिसन (Toni Morrison) यांचं मार्गदर्शन लाभलं.
advertisement
यानंतर त्यांनी D.E. Shaw या हेज फंड कंपनीत नोकरी सुरू केली. याच ठिकाणी त्यांची भेट जेफ बेझोस यांच्याशी झाली. 1993 साली दोघांनी लग्न केलं आणि एकत्र येऊन Amazon ची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात मॅकेंझी स्कॉट कंपनीच्या योजना, शिपिंग आणि अकाउंट्स विभागात महत्त्वाची भूमिका निभावत होत्या.
advertisement
त्यानंतर त्यांनी आपलं लक्ष कुटुंब आणि लेखन या क्षेत्रांकडे वळवलं. त्यांच्या दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. The Testing of Luther Albright (2005) ज्यासाठी त्यांना American Book Award मिळाला.  तर Traps (2013) ही त्यांची दुसरी कादंबरी आहे.
advertisement
घटस्फोटानंतरचा नवा अध्याय
2019 मध्ये जेफ बेझोस यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर मॅकेंझी स्कॉट यांना अमेझॉनमधील 1.3 टक्के हिस्सा मिळाला, ज्यामुळे त्या सुमारे 41.9 अब्ज डॉलर्सच्या मालकीण झाल्या. पण त्यांनी ही अफाट संपत्ती स्वतःकडे न ठेवता समाजाच्या भल्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी Giving Pledge या जागतिक उपक्रमावर सही करून वचन दिलं की, त्या आपल्या संपत्तीचा बहुतांश भाग आयुष्यभरात दान करतील.
आजपर्यंत त्यांनी 19 अब्ज डॉलर्सहून अधिक रक्कम विविध सामाजिक कारणांसाठी दान केली आहे. याच वर्षी त्यांनी अमेरिकेतील अश्वेत महाविद्यालये (Black Colleges) मजबूत करण्यासाठी 70 दशलक्ष डॉलर (सुमारे 580 कोटी रुपये) इतकं योगदान दिलं आहे.
दान करण्याची खास शैली
मॅकेंझी स्कॉट यांच्या समाजसेवेची सर्वात वेगळी बाब म्हणजे त्यांचे ‘बिनशर्त दान’ (Unconditional Giving). त्या ज्या संस्थांना निधी देतात, त्यांच्यावर कोणत्याही अटी-शर्ती लादत नाहीत. त्या संस्थांना आपापल्या गरजेनुसार त्या पैशाचा उपयोग करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देतात. त्यांच्या मते- खरी यशस्वी व्यक्ती तीच, जी आपली संपत्ती समाजाला परत देते
मॅकेंझी स्कॉट यांनी हे सिद्ध केलं आहे की- संपत्ती मिळवणं ही यशाची कसोटी नाही. तर ती समाजासाठी वापरणं हेच खऱ्या अर्थाने यश आहे. त्यांची उदारता आणि संवेदनशीलता आज जगभरातील उद्योगपती आणि अब्जाधीशांसाठी प्रेरणादायी उदाहरण बनली आहे. जे केवळ श्रीमंत होण्याऐवजी जगाला बेहतर बनवण्याचं स्वप्न पाहतात.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
एक सही केली अन् 310 कोटींचं दान दिले, कारण ऐकून थक्क व्हाल; रक्कम कुणाला दिली आणि का?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement