आगीचा गोळा बनली इमारत! हाँगकाँगमध्ये २ हजार घरांच्या टॉवरमध्ये भीषण आग; ४४ जणांचा होरपळून मृत्यू, ३०० लोक बेपत्ता

Last Updated:

हाँगकाँगच्या ताई पो जिल्ह्यात वांग फुक कोर्ट या २००० फ्लॅट्सच्या इमारतीला भीषण आग लागली, ४४ मृत, ३०० बेपत्ता, ७०० जवान बचावकार्य करत आहेत, शहरात भीतीचे वातावरण.

News18
News18
हाँगकाँग शहराला हादरवून टाकणारी एक मोठी दुर्घटना बुधवारी ताई पो जिल्ह्यामध्ये घडली आहे. वांग फुक कोर्ट नावाच्या तब्बल २००० फ्लॅट्स असलेल्या एका मोठ्या निवासी इमारतीत भीषण आग लागली. अचानक आग लागली, आगीचे लोळ आणि धूर आकाशात उंच जात होते. आकाशात दूरदूरपर्यंत धुराचे काळे ढग पसरले होते आणि संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या जीवघेण्या घटनेत आतापर्यंत ४४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, ३०० लोक अद्याप बेपत्ता आहेत.
३१ मजली इमारतींना वेढा
सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग स्थानिक वेळेनुसार दुपारी लागली. आज काही मिनिटांत ३१ मजली टॉवरच्या अनेक मजल्यांवर वेगानं पसरली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हॉँगकाँगच्या अग्निशमन सेवा विभागाने या घटनेला लेव्हल-५ अलार्म फायर म्हणून घोषित केले, जी हॉँगकाँगमधील आगीची सर्वात गंभीर श्रेणी आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
advertisement
एक कर्तव्यनिष्ठ जवान शहीद
या भीषण दुर्घटनेत आगीच्या लपेटांमध्ये अडकून आतापर्यंत ४४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर सुमारे ३०० लोक बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अत्यंत दुःखद बाब म्हणजे, मृत्यू झालेल्यांमध्ये ३७ वर्षीय एका अग्निशमन दलाच्या जवानाचाही समावेश आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी या जवानाला बहादूर आणि कर्तव्यनिष्ठ असे संबोधत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. बचावकार्य अजूनही युद्धपातळीवर सुरू आहे.
advertisement
७०० हून अधिक जवान बचावकार्यात
घटनास्थळी ७०० हून अधिक अग्निशमन दलाचे जवान अविरत आग विझवण्याचे आणि लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. अनेक ठिकाणी हायड्रॉलिक शिड्यांचा वापर करून उंच मजल्यांवर पाण्याचा मारा केला जात आहे. लाईव्ह फुटेजमधून दिसत आहे की, भीषण आग आणि दाट धुरामुळे बचावकार्य खूप कठीण झाले आहे. या जीवघेण्या परिस्थितीतही मदतनीस स्वतःचा जीव धोक्यात घालून इमारतींमध्ये प्रवेश करत आहेत. संकटात अडकलेल्या लोकांसाठी हाच आशेचा किरण आहे.
advertisement
आत अडकलेल्या लोकांची वाढली चिंता
हाँगकाँग सरकार आणि अग्निशमन सेवा विभागाने भीती व्यक्त केली आहे की, अजूनही काही लोक इमारतींच्या आत अडकलेले असू शकतात. मात्र, त्यांची नेमकी संख्या किती आहे, हे लगेच सांगणे शक्य नाही. बचाव दलासमोर दाट धूर, इमारतींची प्रचंड उंची आणि अरुंद जिन्यांचे आव्हान उभे आहे. इमारती आगीचा गोळा बनल्या असताना, आतून किंकाळण्याचे आवाज येत होते आणि जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावत होते. या भीषण परिस्थितीतून लोक लवकर सुरक्षित बाहेर पडावेत, यासाठी आता प्रार्थना सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
आगीचा गोळा बनली इमारत! हाँगकाँगमध्ये २ हजार घरांच्या टॉवरमध्ये भीषण आग; ४४ जणांचा होरपळून मृत्यू, ३०० लोक बेपत्ता
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement