Vladimir Putin : पुतीन यांच्यावर अटकेची टांगती तलवार! ब्राझीलने म्हटलं रिओ जी20मध्ये सहभागी झाले तर...

Last Updated:

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे अटकेच्या भीतीने भारतात जी२० परिषदेत उपस्थित राहिले नसल्याचं म्हटलं जात आहे.

News18
News18
दिल्ली, 10 सप्टेंबर : भारताच्या अध्यक्षतेखाली जी२० परिषद पार पडली. या परिषदेला जगभरातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे मात्र परिषदेसाठी भारतात आले नाहीत. आता पुढची जी२० परिषद ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ब्राझीलमधील रिओ डि जनेरियोमध्ये ही परिषद होणार आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुइज इनासियो लुला डा सिल्वा यांनी म्हटलं की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन जर या परिषदेसाठी रिओला आले तर त्यांना अटक केली जाणार नाही. दरम्यान, भारताने परिषदेत घोषणापत्र जारी केलं आहे. त्याचे कौतुक रशियासह इतर देशांनीही केले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे अटकेच्या भीतीने भारतात जी२० परिषदेत उपस्थित राहिले नसल्याचं म्हटलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने त्यांच्या अटकेचं वॉरंट जारी केलं आहे. ते जर रशियातून बाहेर पडले असते तर त्यांना अटक केली गेली असती. मात्र रशियाने हे वॉरंट मान्य नसल्याचं म्हटलंय. आयसीसीने पुतीन यांच्याविरोधात युक्रेनच्या मुलांना बेकायदेशीरपणे निर्वासित केल्याबद्दल युद्ध गुन्हा केल्याच्या आरोपाखाली अटक वॉरंट जारी केलं होतं.
advertisement
ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी मुलाखतीत सांगितलं की, पुढच्या वर्षी रिओमध्ये जी२० परिषद होणार आहे. मला वाटतं की पुतीन यांना अटक केली जाणार नाही. ते सहज ब्राझीलला येऊ शकतील. आम्ही शांतताप्रिय आहोत आणि लोकांसोबत चांगला व्यवहार करायला आम्हाला आवडतं. मी ब्राझीलचा राष्ट्राध्यक्ष आहे आणि मला वाटतं की रशियन राष्ट्राध्यक्ष आले तर असा कोणताच मार्ग नाही ज्यामुळे त्यांना अटक होईल. मी पुतीन यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. पुढच्या वर्षी ब्रिक्स परिषद रशियात असेल आणि मी त्यात सहभागी होण्यासाठी रशियाला जाईन.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Vladimir Putin : पुतीन यांच्यावर अटकेची टांगती तलवार! ब्राझीलने म्हटलं रिओ जी20मध्ये सहभागी झाले तर...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement