Imran Khan: इमरान खान यांचा छळ करून हत्या, लष्करप्रमुख मुनीरने संपवल्याची चर्चा; बलुच मंत्र्याचा खळबळजनक दावा

Last Updated:

Imran Khan News: पाकिस्तानात माजी पंतप्रधान इमरान खान यांची तुरुंगात छळ करून हत्या झाल्याच्या अफवा जोरात पसरल्या असून देशभरात खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांना भेटीची परवानगी नाकारल्याने आणि सोशल मीडियावर वाढत्या दाव्यांमुळे संशय अधिकच गडद झाला आहे.

News18
News18
इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्याबाबत एक धक्कादायक दावा समोर आला असून, त्यांना तुरुंगात छळ करून ठार मारल्याचा आरोप केला जात आहे. बलुचिस्तानच्या तथाकथित मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सने असा आरोप केला आहे की, पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी हा कट रचला. मात्र या दाव्यांना कोणतेही अधिकृत पुष्टीकरण मिळालेले नाही.
advertisement
दरम्यान सोशल मीडियावर जेलच्या बाहेर जमलेल्या मोठ्या गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यात असा दावा करण्यात येत आहे की, इमरान खान यांच्या बहिणींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे इमरान खान यांना मारण्यात आले असण्याच्या शंका अधिकच गडद झाल्या आहेत.
advertisement
सोशल मीडिया आणि काही अफगाण माध्यमांमध्ये अशा पोस्ट्स झपाट्याने फिरू लागल्या आहेत की, रावळपिंडीच्या अदियाला जेलमध्येच इमरान खान यांची हत्या झाली आहे. ‘मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स बलुचिस्ताननावाच्या एका अकाउंटसह अनेक हँडल्सनी हे दावे शेअर केले आहेत. या अकाउंटने लिहिलं की, पंजाबमधील तुरुंगांमधून अशी माहिती येत आहे की इमरान खान यांना ताब्यात असताना ठार मारण्यात आलं असून, यामागे आसिम मुनीर आणि ISI असल्याचा दावा करण्यात आला आहे.
advertisement
त्या पोस्टमध्ये काय म्हटले
पंजाबच्या तुरुंगांतून अशी माहिती समोर येत आहे की, ताब्यात ठेवण्यात आलेल्या इमरान खान यांची आसिम मुनीर आणि त्यांची ISI प्रशासनाने हत्या केली आहे. ही माहिती खरी ठरली, तर पाकिस्तानसाठी हा शेवटचा धक्का ठरेल आणि त्यांच्या उरलेल्या वैधतेचा पूर्णपणे अंत होईल.
advertisement
मात्र या दाव्यांची कोणतीही स्वतंत्र पडताळणी झालेली नाही.
इमरान खान अनेक महिन्यांपासून जनतेच्या नजरेपासून दूर
इमरान खान (PTI प्रमुख) ऑगस्ट 2023 पासून अदियाला जेलमध्ये आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून इस्लामाबाद प्रशासनाने त्यांच्या भेटींवर एकप्रकारे अनधिकृत बंदी लागू केली आहे. कुटुंबीय, मित्रपरिवार किंवा राजकीय नेत्यांना त्यांना भेटू दिले जात नाही.
advertisement
मंगळवारी त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्यानंतर त्यांच्या तीन बहिणींनी त्यांची भेट घेण्यासाठी जेलला भेट दिली. त्यांचा आरोप आहे की पोलिसांनी त्यांच्याशी उग्र वर्तन केले. नुरीन खान, अलीमा खान आणि उझ्मा खान यांनी सांगितले की, पोलिसांकडून त्यांना तसेच PTI समर्थकांना जोरजबरी, ढकलाढकली आणि मारहाण झाली.
advertisement
Khyber Pakhtunkhwa चे मुख्यमंत्रीही सात वेळा परत
खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहैल आफ्रिदी यांनाही इमरान खान यांना भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. ते अदियाला जेलमध्ये गेल्या सात प्रयत्नांपासून भेटीसाठी जात आहेत, पण प्रत्येकवेळी जेल प्रशासनाने त्यांना परत पाठवले आहे. इमरान खान यांचा आरोप आहे की, जेलचे प्रशासन पूर्णपणे पाकिस्तानी लष्कराच्या निर्देशांवर चालत आहे आणि त्यांच्या भेटींना जाणीवपूर्वक अडथळा आणला जात आहे.
या सर्व घडामोडींमुळे पाकिस्तानात राजकीय तणाव वाढला आहे आणि इमरान खान यांच्या सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Imran Khan: इमरान खान यांचा छळ करून हत्या, लष्करप्रमुख मुनीरने संपवल्याची चर्चा; बलुच मंत्र्याचा खळबळजनक दावा
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement