ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनाऱ्यावर मृत्यूचा तांडव, सिडनीच्या बॉन्डी बीचवर बेछूट गोळीबार;10 जणांचा मृत्यू, हनुक्का उत्सवात रक्तपात
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Sydney Bondi Beach Mass Shooting: सिडनीच्या बॉन्डी बीचवर हनुक्का सणाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण गोळीबाराने संपूर्ण ऑस्ट्रेलिया हादरला आहे. हजारो लोकांच्या गर्दीत झालेल्या या हल्ल्यात किमान 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
सिडनी: ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील बॉन्डी बीच येथे हनुक्का सणाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेत किमान 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार काळ्या कपड्यांत आलेल्या दोन बंदूकधाऱ्यांनी तब्बल 1,000 ते 2,000 लोकांच्या जमावावर गोळीबार केला.
advertisement
या हल्ल्यात 50 हून अधिक गोळ्या झाडल्या गेल्या, त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर प्रचंड गोंधळ उडाला. लोक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागले, तर काहींनी जवळच्या इमारतींमध्ये आश्रय घेतला.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “बॉन्डीमधील दृश्ये अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक आहेत. पोलीस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचून जीव वाचवण्याचे काम करत आहेत. या घटनेत त्रास झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी आम्ही आहोत.”
advertisement
— Anthony Albanese (@AlboMP) December 14, 2025
पंतप्रधानांनी पुढे सांगितले की त्यांनी ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिस (AFP) आयुक्त आणि न्यू साउथ वेल्सचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. “आम्ही एनएसडब्ल्यू पोलिसांसोबत समन्वय ठेवून काम करत आहोत. अधिकृत माहिती मिळताच पुढील अपडेट दिले जातील. परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे,” असे त्यांनी आवाहन केले.
advertisement
न्यू साउथ वेल्स पोलिसांनी या घटनेत दोन जणांना ताब्यात घेतल्याची वृत्ताला दुजोरा दिला आहे. यापैकी एका बंदूकधाऱ्याचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला, तर दुसरा आरोपी जखमी अवस्थेत अटक करण्यात आला आहे.
सध्या संपूर्ण परिसर लॉकडाऊन करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर सुरक्षा मोहीम सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना बॉन्डी बीच परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
एनएसडब्ल्यू पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे की, “पोलीस कारवाई सुरू आहे. नागरिकांनी परिसर टाळावा. घटनास्थळी असलेल्यांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.”
Shooting at Australia's Bondi beach:
A local deals with the active shooter, and brings him down. pic.twitter.com/EjSius4wEj
— Manas Gangwar (@ManasGangwar8) December 14, 2025
advertisement
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लोक घाबरून पळताना, सायरनचा आवाज आणि जखमींना मदत करताना आपत्कालीन कर्मचाऱ्यांचे दृश्य दिसत आहे. आपत्कालीन सेवांनी अनेक जखमींना सिडनीतील विविध रुग्णालयांत दाखल केले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा गोळीबार हनुक्का परेड आणि समुदायाच्या कार्यक्रमादरम्यान झाला होता. पोलिस सध्या या हल्ल्यामागील कारण आणि वेळापत्रकाचा तपास करत आहेत. अधिक माहिती मिळेपर्यंत बॉन्डी बीच परिसर जाण्याचे टाळावे असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 14, 2025 4:11 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनाऱ्यावर मृत्यूचा तांडव, सिडनीच्या बॉन्डी बीचवर बेछूट गोळीबार;10 जणांचा मृत्यू, हनुक्का उत्सवात रक्तपात









