Tsunami Alert: रशियाला हादरवणारा महाभूकंप; 3 शक्तिशाली भूकंपाने महासागर खवळला, त्सुनामीचा इशारा

Last Updated:

Powerful Earthquakes Strike Off Russia: रशियाच्या कामचात्का किनारपट्टीला रविवारी तीन शक्तिशाली भूकंपांचे धक्के बसले. या भूकंपांमुळे USGS ने त्सुनामीचा संभाव्य धोका जाहीर केला आहे.

News18
News18
मॉस्को: रशियाच्या पूर्वेकडील कामचात्का प्रदेशाच्या किनाऱ्यालगत रविवारी भूकंपाचे तीन शक्तिशाली धक्के बसले. या धक्क्यांमुळे अमेरिकी भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने (USGS) त्सुनामीचा इशारा जारी केला आहे.
या भागात 7.0 आणि 6.7 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंप झाले. मात्र यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला नव्हता. मात्र सकाळी 8:49 वाजता आलेल्या 7.4 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे USGS ने इशारा दिला की, भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून 300 किलोमीटर (186 मैल) परिसरात धोकादायक त्सुनामी लाटा येऊ शकतात.
Marketमध्ये असा डबल धमाका प्रथमच, स्पेशल डिव्हिडेंड सोबत मिळणार बोनस शेअर्स
तत्काळ कोणत्याही जखमी किंवा मृत्यूबाबतच्या घटना नोंदवल्या गेल्या नव्हत्या. या सुरुवातीच्या भूकंपांनंतर अनेक आफ्टरशॉक्सही जाणवले, ज्यात आणखी एक 6.7 तीव्रतेचा भूकंप समाविष्ट होता, असे USGS ने सांगितले. भूकंपाचे केंद्रबिंदू हे कामचात्का प्रदेशाची राजधानी पेट्रोपावलोव्स्क-कामचात्स्कीच्या पूर्वेस सुमारे 140 किलोमीटर अंतरावर होते.
advertisement
रशियाच्या आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाने टेलिग्रामवर सांगितले की, बियरिंग समुद्राच्या दक्षिण-पश्चिमेकडील कमांडर आयलंड्समध्ये 60 सेंटीमीटरपर्यंतच्या लाटा येण्याची शक्यता आहे. तर कामचात्का द्वीपकल्पात 15 ते 40 सेंटीमीटर उंचीच्या लाटा येऊ शकतात.
दरम्यान जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइंसेस (GFZ) ने रविवारी कामचात्काच्या किनाऱ्यालगत 6.5 पेक्षा अधिक तीव्रतेचे दोन भूकंप झाल्याची नोंद केली. त्यांच्या मते या भूकंपांची तीव्रता अनुक्रमे 6.6 आणि 6.7 होती आणि दोन्ही भूकंपांचे केंद्र सुमारे 10 किलोमीटर (6 मैल) खोलीवर होते.
advertisement
कामचात्का द्वीपकल्प हे पॅसिफिक आणि नॉर्थ अमेरिकन टेक्टॉनिक प्लेट्सच्या संगमावर वसलेले असल्यामुळे हा भाग भूकंपाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मानला जातो. 1900 पासून येथे 8.3 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे सात प्रमुख भूकंप झाले आहेत.
4 नोव्हेंबर 1952 रोजी कामचात्कामध्ये 9.0 तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यात काही नुकसान झाले होते.पण मृत्यूची नोंद झाली नव्हती. मात्र या भूकंपामुळे हवाई बेटांवर तब्बल 9.1 मीटर (30 फूट) उंच लाटा उसळल्या होत्या. अलास्का हे अमेरिकेचे राज्य बियरिंग समुद्राच्या दुसऱ्या टोकाला आहे.मात्र यावेळी झालेल्या भूकंपात कोणतेही अमेरिकन भूभाग त्सुनामी अलर्ट झोनमध्ये नव्हते.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Tsunami Alert: रशियाला हादरवणारा महाभूकंप; 3 शक्तिशाली भूकंपाने महासागर खवळला, त्सुनामीचा इशारा
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement