Explainer: ट्रम्पचा व्हिसा बॉम्ब; H-1Bमुळे भारतीयांसाठी काय बदलणार? किती फटका? नवा नियम कोणासाठी घातक

Last Updated:

H-1B Visa: अमेरिकेने H-1B व्हिसाच्या फीमध्ये मोठी वाढ केली असून ती थेट 88 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो भारतीय आयटी प्रोफेशनल्स आणि विद्यार्थ्यांच्या करिअरवर गंभीर परिणाम होणार आहे.

News18
News18
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या शुल्कात प्रचंड वाढ जाहीर केली आहे. याआधी साधारणतेलाख रुपये असणारी फी आता थेट ८८ लाख रुपये (१००,००० डॉलर्स) इतकी करण्यात आली आहे. या निर्णयाचा परिणाम थेट भारतातीललाखांहून अधिक आयटी व्यावसायिकांवर होणार आहे. विशेषतः अमेरिकेत काम करणाऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्या भारतीयांवर याचा मोठा आर्थिककरिअरविषयक परिणाम होऊ शकतो.
advertisement
H-1B व्हिसा म्हणजे काय?
हा एक नॉन-इमिग्रंट व्हिसा असून तो लॉटरी प्रणालीद्वारे दिला जातो. याची कालावधी तीन वर्षे असते आणि दरवर्षी शुल्क भरावे लागते. शुल्कवाढ झाल्यानंतर भारतीय विद्यार्थी, आयटी प्रोफेशनल्सस्टार्ट-अपमध्ये काम करणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
advertisement
ट्रम्पच्या निर्णयाचे 10 मोठे परिणाम
-२ लाखांपेक्षा अधिक भारतीयांवर थेट परिणाम होऊ शकतो.
-अमेरिकन आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत भारतीय कर्मचाऱ्यांवर विशेष फटका.
-अमेरिकेत नव्या नोकऱ्यांच्या संधी कमी होऊ शकतात.
-अमेरिकन विद्यापीठांत मास्टर्स वा पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर परिणाम.
advertisement
-शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत नोकरी मिळवण्याचे मार्ग मर्यादित होतील, कारण प्राधान्य अमेरिकन नागरिकांना दिले जाईल.
-भारतीय विद्यार्थ्यांवर व कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण.
-अमेरिकेत करिअरची सुरुवात करणाऱ्या तरुणांना अडचणी येतील.
-STEM क्षेत्रातील (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग, मॅथ्स) भारतीयांना सर्वाधिक फटका.
advertisement
-मिड-लेव्हलएंट्री लेव्हल कर्मचाऱ्यांना व्हिसा मिळणे कठीण होईल.
-अमेरिकन कंपन्या नोकऱ्या इतर देशांत आउटसोर्स करण्याचा पर्याय निवडू शकतात. ज्यामुळे भारतीयांना थेट नुकसान होईल.
भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम
तज्ज्ञांच्या मते हा निर्णय फक्त भारतीयांसाठीच नाही तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठीही धोकादायक ठरू शकतो. कारण आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भारतीय कामगारांवर अमेरिकेच्या कंपन्या अवलंबून आहेत. भारत सरकार या निर्णयावर कडक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Explainer: ट्रम्पचा व्हिसा बॉम्ब; H-1Bमुळे भारतीयांसाठी काय बदलणार? किती फटका? नवा नियम कोणासाठी घातक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement