advertisement

तुमची सोय तुम्हीच करा, माझ्याकडे येऊ नका! ट्रम्प यांच्या वक्तव्याने इंग्लंडच्या पोटात गोळा आला, जगाचे धाबे दणाणले

Last Updated:

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मूज सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे प्रभावित झालेल्या देशांबद्दल एक धक्कादायक आणि खळबळजनक वक्तव्य केले आहे.

News18
News18
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझ सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रभावित देशांना स्वतःची ऊर्जा व्यवस्था सुरक्षित करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः UK सारख्या देशांना लक्ष्य करत ट्रम्प यांनी इराणविरोधातील कारवाईत सहभागी न झाल्याबद्दल टीका केली.
ट्रम्प यांनी ‘Truth Social’वर लिहिले की हॉर्मुझ सामुद्रधुनीमुळे ज्यांना जेट इंधन मिळत नाही जसे की ब्रिटन, ज्यांनी इराणविरोधातील कारवाईत भाग घेतला नाही त्यांच्यासाठी माझी सूचना आहे. पहिले अमेरिकेकडून तेल खरेदी करा, आमच्याकडे भरपूर आहे. आणि दुसरे धैर्य दाखवा, सामुद्रधुनीत जा आणि ते स्वतः मिळवा.
ते पुढे म्हणाले तुम्हाला स्वतःसाठी लढायला शिकावे लागेल. अमेरिका आता मदतीसाठी येणार नाही, जसे तुम्ही आमच्यासाठी आले नाहीत. ट्रम्प यांनी इराण मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाले आहे असा दावाही केला आणि कठीण भाग पूर्ण झाला आहे, आता स्वतःचे तेल मिळवा, असेही त्यांनी म्हटले.
advertisement
इराणची प्रत्युत्तरात्मक कारवाई
दरम्यान इराणने नव्या क्षेपणास्त्र हल्ल्यांची मालिका सुरू ठेवत ट्रम्प यांच्या इशाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. ट्रम्प यांनी इराणला युद्ध संपवण्यासाठी करार मान्य करण्यास सांगितले असून अन्यथा खार्ग आयलंड (Kharg Island) तसेच वीज प्रकल्प आणि पाणी गोडीकरण केंद्रे उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे.
इराणने मात्र कोणत्याही चर्चेचे खंडन करत ट्रम्प यांच्यावर खोटे बोलण्याचा आरोप केला आहे. तसेच अमेरिकेने भू-कारवाईची तयारी सुरू केल्याचा आरोपही केला आहे.
advertisement
इस्रायलचा दावा
बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की इराणविरोधातील लष्करी उद्दिष्टांपैकी निम्म्याहून अधिक उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत. मात्र युद्ध किती काळ चालेल याबाबत त्यांनी कोणतीही वेळमर्यादा दिली नाही.
आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन?
तज्ज्ञांच्या मते वीज प्रकल्प, तेल साठे आणि पाणी प्रकल्प यांसारख्या नागरी सुविधांवर हल्ला करणे आंतरराष्ट्रीय मानवीय कायद्याचे उल्लंघन ठरू शकते आणि हे युद्धगुन्हा मानले जाऊ शकते.
advertisement
जागतिक परिणाम
या संघर्षामुळे जागतिक स्तरावर मोठा परिणाम दिसून येत आहे.
1) कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी चढ-उतार
2) मध्यपूर्वेत तणाव वाढला
3) दुबई, एरबिल, जेरुसलेम आणि रियाध येथे स्फोट आणि हवाई हल्ल्यांचे सायरन
रियाधजवळ ड्रोन अडवताना दोन जण जखमी झाल्याची माहिती नागरी संरक्षण विभागाने दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
तुमची सोय तुम्हीच करा, माझ्याकडे येऊ नका! ट्रम्प यांच्या वक्तव्याने इंग्लंडच्या पोटात गोळा आला, जगाचे धाबे दणाणले
Next Article
महाराष्ट्र महसूल विभागाचा मोठा निर्णय, नवे रेडी रेकनर दर जाहीर; बावनकुळेंनी मांडले गणित, घरं महागणार की स्वस्त?
महाराष्ट्र महसूल विभागाचा मोठा निर्णय, नवे रेडी रेकनर दर जाहीर; बावनकुळेंनी मांडले गणित, घरं महागणार की स्वस्त?
  • नव्या आर्थिक वर्षाचे रेडी रेकनर दर फायनल

  • महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

  • महसूल विभागाचे नवे नोटिफिकेशन

View All
advertisement