विमानातून उतरताना फ्रान्सच्या अध्यक्षांना थोबाडीत मारले; परदेशी दौऱ्यात बायकोचा राग फुटला, LIVE Video
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Emmanuel Macron Video: फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात त्यांच्या पत्नी ब्रिजिट यांनी त्यांना कानाखाली मारल्याचे दिसते. हा व्हिडिओ खरा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हनोई (व्हिएतनाम) : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, व्हिएतनामच्या राजधानीत विमानातून उतरत असताना त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रों यांनी त्यांना कानाखाली मारली. ही घटना फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रों यांच्या राजकीय दौऱ्यात घडली. ते ब्रिजिट यांच्यासह व्हिएतनाममध्ये पोहोचले होते. जेव्हा राष्ट्रपती विमानाचे दरवाजे उघडले जातात. तेव्हा मॅक्रों अचानक थोडे मागे हटताना दिसतात आणि त्यांच्या पत्नी ब्रिजिट त्यांच्या चेहऱ्यावर हाताने जोरात धक्का देताना दिसते.
या घटनेदरम्यान खाली पत्रकार आणि कॅमेरामन यांची गर्दी असल्याचे लक्षात येताच मॅक्रों चेहऱ्यावर एक कृत्रिम हास्य आणतात हात हलवतात आणि काही क्षणांतच परत विमानात लपतात. या घटनेने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि लगेचच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
बॉर्डरवर राफेल, S-400 तैनात; डोळे वटारले तर जिवंत परतणार नाही, सीमेवर तणाव वाढला
सुरुवातीला फ्रेंच राष्ट्रपती भवनाने हा व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून बनवलेला फेक असल्याचा दावा केला होता. मात्र काही वेळानंतर या व्हिडिओची सत्यता समोर आली. त्यानंतर राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत वक्तव्यामध्येही बदल करण्यात आला.
advertisement
मॅक्रों यांचे एक जवळचे मित्र यांनी ही घटना सामान्य पती-पत्नीतील भांडण असल्याचे सांगितले.
व्हिडिओमधून आणखी एक गोष्ट लक्षात आली – मॅक्रों आणि ब्रिजिट विमानातून उतरतेवेळी एकमेकांचा हात धरलेला नव्हता आणि मॅक्रों फारसे अस्वस्थ आणि सावध वाटत होते. त्यांच्या चेहऱ्यावरून असे जाणवत होते की ते कोणताही सार्वजनिक गोंधळ टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.
advertisement
🔴 À Hanoï, une séquence entre Emmanuel et Brigitte Macron à la sortie de l'avion fait le buzz : chamaillerie, geste complice ou coup au visage ? L’Élysée évoque un "moment de détente" avant la tournée en Asie#ApollineMatin pic.twitter.com/WVeJ1x6pPD
— RMC (@RMCInfo) May 26, 2025
advertisement
लव्ह स्टोरी...
इमॅन्युएल मॅक्रों आणि ब्रिजिट यांचं नातं आधीपासूनच चर्चेत राहिलेलं आहे. दोघांच्या वयात 24 वर्षांचा मोठा फरक आहे. ब्रिजिटचा जन्म 13 एप्रिल 1953 रोजी झाला असून त्या एकेकाळी मॅक्रों यांच्याच शाळेतील शिक्षिका होत्या. मॅक्रों केवळ 15 वर्षांचे असताना ते ब्रिजिटच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी ब्रिजिट सुमारे 39 वर्षांच्या होत्या आणि त्या आधीच विवाहित होत्या व त्यांना तीन मुलं होती.
advertisement
मॅक्रों यांनी वयाच्या 16व्या वर्षी ब्रिजिटला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. मात्र मॅक्रोंच्या कुटुंबाने या नात्याला विरोध केला होता. समाजातही त्यांचा प्रेमसंबंध आणि पुढील विवाह अनेकांच्या चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरला होता. पण प्रेमासाठी ब्रिजिटने आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि अखेर 2007मध्ये जेव्हा मॅक्रों 29 वर्षांचे आणि ब्रिजिट 54 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये खासगी समारंभात विवाह केला.
advertisement
2017 मध्ये मॅक्रों फ्रान्सचे राष्ट्रपती झाले आणि ब्रिजिट फर्स्ट लेडी बनल्या. त्या आजही मॅक्रों यांच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनात सक्रिय सहभाग घेतात आणि जवळजवळ सर्व विदेशी दौर्यांमध्ये त्यांच्या सोबत असतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 26, 2025 5:27 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
विमानातून उतरताना फ्रान्सच्या अध्यक्षांना थोबाडीत मारले; परदेशी दौऱ्यात बायकोचा राग फुटला, LIVE Video


