पूर्ण फिट होती तरुणी, अचानक शरिरावर आली सूज, पुढच्या काही तासात मृत्यूने गाठलं!

Last Updated:

24 वर्षांची पूर्णपणे निरोगी मुलगी, पण अचानक तिच्या शरिरावर सूज आली आणि त्यांनतर पुढच्या काही तासांमध्येच तिचा मृत्यू झाला.

पूर्ण फिट होती तरुणी, अचानक शरिरावर आली सूज, पुढच्या काही तासात मृत्यूने गाठलं!
पूर्ण फिट होती तरुणी, अचानक शरिरावर आली सूज, पुढच्या काही तासात मृत्यूने गाठलं!
मुंबई : लहान वयात कुणाचंही निधन होणं अत्यंत दुर्दैवी असतं, घरात लहान व्यक्तीचं निधन झालं तर संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो, एवढंच नाही तर घरातल्या सर्वांना या दु:खातून सावरण्यासाठी वेळ जातो. 24 वर्षांची पूर्णपणे निरोगी असणारी मुलगी अचानक गेल्यामुळे अशाच एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुणीचं शरीर अचानक सुजू लागलं आणि तिच्या हातांवर पुरळ उठले. डॉक्टरांना किरकोळ ऍलर्जी वाटली, पण अखेर तिचा मृत्यू झाला.
वेल्समधील तरुण धावपटू जॉर्जिया टेलरच्या अचानक मृत्यूने ब्रिटनला धक्का बसला आहे. डॉक्टरांनी ज्याला किरकोळ ऍलर्जी मानले होते त्याने अखेर तिचा जीव घेतला. 24 वर्षांची ही एक उत्साही आणि निरोगी महिला होती जिने या वर्षी एप्रिलमध्ये लंडन मॅरेथॉन धावली. पण, ऑगस्टमध्ये ती अचानक गंभीर आजारी पडली आणि काही तासांतच तिचा मृत्यू झाला.
advertisement
कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, उन्हाळ्याच्या सुरुवातीला जॉर्जियाला तिच्या बोटांवर पुरळ आणि खाज येऊ लागली. तिने त्याकडे दुर्लक्ष केले, तिला वाटले की ही तिच्या अंगठ्यांमुळे होणारी प्रतिक्रिया आहे. काही आठवड्यांनंतर, तिचा चेहरा सुजू लागला, तिचे डोळे सूजले आणि तिच्या हातांवर नवीन पुरळ उठले.

डॉक्टरांना वाटली ऍलर्जी

जुलैमध्ये जेव्हा ती तिच्या फॅमिली डॉक्टरकडे गेली तेव्हा त्यांनी ही लक्षणे ऍलर्जीच्या प्रतिक्रियेमुळे असल्याचे सांगितले आणि अँटीहिस्टामाइन्स आणि हायड्रोकोर्टिसोन ही औषधं लिहून दिली, पण या औषधांचा काही उपयोग झाला नाही. काही दिवसांनी, जेव्हा तिला श्वास घेण्यास त्रास होत होता, तेव्हा ती आपत्कालीन कक्षात गेली. चाचण्यांमध्ये काहीही आढळले नाही आणि तिला अँटीअॅलर्जी औषध देऊन घरी पाठवण्यात आले.
advertisement
ऑगस्टच्या सुरुवातीला, जॉर्जिया ग्रीसमधील झांटे येथे कुटुंबासह सुट्टीवर असताना, चालताना तिच्या उजव्या पायात हलका वेदना जाणवल्या. 'सुरुवातीला आम्हाला वाटले की फक्त स्नायूंमध्ये वेदना आहे, पण दुसऱ्या दिवशी, तिला नीट चालताही येत नव्हते. एका स्थानिक फार्मासिस्टने वेदनाशामक आणि आयबुप्रोफेन लिहून दिले, ज्यामुळे थोडा आराम मिळाला, असं तिची आई निकोल म्हणाली. जॉर्जियाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचं गूढ उकलण्यात अजूनही डॉक्टरांना यश आलेलं नाही.
मराठी बातम्या/Viral/
पूर्ण फिट होती तरुणी, अचानक शरिरावर आली सूज, पुढच्या काही तासात मृत्यूने गाठलं!
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement