OMG! 5000 वर्षे जुना मृतदेह, त्यातून अचानक येऊ लागला सुगंध, शास्त्रज्ञही हैराण, मोठा खुलासा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Egyptian mummie smell : संशोधकांनी 5000 वर्षे जुन्या 9 ममींचं परीक्षण केलं. जर्नल ऑफ द अमेरिकन केमिकल सोसायटीमध्ये याबाबतचा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : ममी हे एक जतन केलेलं प्रेत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ममीकरण पद्धती होत्या. ममीफिकेशनचा मुख्य उद्देश मृत शरीर सुरक्षित आणि संरक्षित ठेवणं. आत्मा पुढील जन्मानत शरीर परत मिळवू शकेल, अशी धारणा होती. आता मृत प्रेत ठेवणं म्हणजे त्यातून कुजण्याचा वास, दुर्गंधी येत असावी असं अनेकांना वाटतं. पण संशोधनातून धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
संशोधकांनी 5000 वर्षे जुन्या 9 ममींचं परीक्षण केलं. जर्नल ऑफ द अमेरिकन केमिकल सोसायटीमध्ये याबाबतचा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. लेखात असं म्हटलं आहे की ममीच्या आत कोणताही हस्तक्षेप न करता नमुना घेण्यात आला.
शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात असं आढळून आलं आहे की 5000 वर्षांपासून शवपेटीत ठेवलेल्या प्राचीन इजिप्शियन ममीला अजूनही चांगला वास येतो. या काळात त्यांना त्यांच्या वासाच्या तीव्रतेत फरक आढळला. पण त्यांनी त्या सर्वांच्या सुगंधाचं वर्णन वृक्षाच्छादित, मसालेदार आणि गोड असं केलं. त्यात कदाचित मृतदेह जतन करण्याच्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या पाइन आणि ज्युनिपर रेझिनपासून मिळणारा फुलांचा सुगंध असावा.
advertisement
ममीचा वास पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न
संशोधकांनी सांगितलं की जर वासाची रचना रासायनिक पद्धतीने पुन्हा तयार केली तर इतरांना ममीचा वास अनुभवता येईल आणि आतील शरीर कधी कुजायला लागलं आहे हे सांगता येईल.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल हेरिटेजच्या संशोधन संचालक सेसिलिया बेम्बिब्रे यांनी संशोधन पथकाचं नेतृत्व केलं. ते म्हणाले की आम्हाला ममीचा वास घेण्याचा अनुभव सांगायचा आहे. म्हणूनच आम्ही कैरोमधील इजिप्शियन संग्रहालयात सादरीकरणासाठी वास पुन्हा तयार करण्याचं काम करत आहोत.
advertisement
ते म्हणतात की प्राचीन इजिप्शियन लोक मृत शरीराचं ममी करताना त्यावर सुगंधी पेस्ट लावत असत. त्यांचा असा विश्वास होता की ममी बनवताना साठवलेल्या वस्तू त्या व्यक्तीच्या आत्म्यासह मरणोत्तर जीवनात जातात. म्हणूनच ममीफिकेशनच्या वेळी फारो (राजे) आणि कुलीन वर्गातील सदस्यांना तेल, मेण आणि बामने सजवले जात असे. बेम्बिब्रे म्हणाले की चित्रपट आणि पुस्तकांमध्ये, ममीचा वास घेणाऱ्या व्यक्तीसोबत भयानक गोष्टी घडतात.
Location :
Delhi
First Published :
May 23, 2025 4:00 PM IST
मराठी बातम्या/Viral/
OMG! 5000 वर्षे जुना मृतदेह, त्यातून अचानक येऊ लागला सुगंध, शास्त्रज्ञही हैराण, मोठा खुलासा