Ramayan : रावणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नाही? शव आजही सुरक्षित? मग आहे कुठे?

Last Updated:

Ramayan Story : लोकांचा असा विश्वास आहे की रावणाचा वध केल्यानंतर भगवान रामाने मृतदेह विभीषणाला सोपवला पण घाईघाईत ते मृतदेहाचे दहन करायला विसरले. त्यानंतर रावणाचा मृतदेह तसाच पडला. जो आजही तसाच आहे, असं म्हणतात.

News18
News18
नवी दिल्ली : प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला हे सगळ्यांना माहिती आहे. पण रामायणाच्या अशा गोष्टी आहेत, ज्या अजूनही रहस्य आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रावणाचे अंत्यसंस्कार. रावणाच्या मृतदेहार अंत्यसंस्कार झाले नाहीत असं म्हणतात. रावणाचं मृत शरीर अद्यापही सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. मग रावणाचा मृतदेह आहे कुठे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
लोकांचा असा विश्वास आहे की रावणाचा वध केल्यानंतर भगवान रामाने मृतदेह विभीषणाला सोपवला पण घाईघाईत ते मृतदेहाचे दहन करायला विसरले. त्यानंतर रावणाचा मृतदेह तसाच पडला. जो आजही तसाच आहे, असं म्हणतात. असाही दावा केला जातो की नाग कुळातील लोकांनी रावणाचा मृतदेह सोबत नेला कारण त्यांचा असा विश्वास होता की रावणाचा मृत्यू तात्पुरता होता.
advertisement
असं म्हटलं जातं की रावणाचा मृतदेह ममीच्या स्वरूपात ठेवण्यात आला आहे. रावणाच्या मृत शरीरावर असा लेप लावण्यात आला आहे की 10 हजार वर्षांनंतरही तो खराब झालेला नाही. रावणाचा मृतदेह 17 फूट लांब शवपेटीत ठेवण्यात आला आहे. या शवपेटीखाली रावणाचा अमूल्य खजिना आहे असंही म्हटलं जातं. या खजिन्याचं रक्षण एका भयंकर नागाने आणि अनेक धोकादायक प्राण्यांनी केलं आहे.
advertisement
रावणाचा मृतदेह नेमका आहे कुठे?
श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय रामायण संशोधन केंद्राने रामायणाशी संबंधित 50 ठिकाणं शोधून काढली आहेत. रामायणातही या ठिकाणांचा उल्लेख आहे. यापैकी एक श्रीलंकेतील रग्गल जंगल आहे, ज्याच्या मध्यभागी एक मोठा पर्वत आहे, जिथं रावणाचा मृतदेह ठेवल्याचा दावा केला जातो.
advertisement
दाव्यानुसार रावणाचा मृतदेह श्रीलंकेतील रग्गलाच्या जंगलात 8 हजार फूट उंचीवर असलेल्या गुहेत ठेवण्यात आला आहे. येथे धोकादायक प्राण्यांचा सतत धोका असल्याने कोणीही येथे येत नाही.
रावणाने मरताना लक्ष्मणला सांगितल्या 3 गोष्टी 
मरताना रावणाने लक्ष्मणाला जीवनाच्या तीन महत्त्वाच्या शिकवणी दिल्या. मरताना रावणाने रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण याला जीवनाची तीन मोठी रहस्ये सांगितली.
advertisement
1) चांगलं काम लवकरात लवकर पूर्ण करा. कारण जीवन अनिश्चित आहे. विलंबामुळे अनेकदा चांगल्या संधी हुकतात.
2) अगदी लहान आजारही प्राणघातक ठरू शकतो. कमकुवत दिसणारा शत्रूही धोकादायक असू शकतो. रावणाने राम आणि त्याच्या सैन्याला कमी लेखलं, ज्यामुळे त्याचा पराभव झाला.
3) आयुष्याशी संबंधित गुपिते कोणाशीही शेअर करू नका, मग ती कितीही प्रिय असली तरी. रावणाच्या नाभीत लपलेल्या अमृत कुंडाचं रहस्य त्याचा भाऊ विभीषणाला माहीत होते, ज्यामुळे रावणाचा पराभव झाला.
advertisement
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ramayan : रावणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नाही? शव आजही सुरक्षित? मग आहे कुठे?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement