advertisement

रेल्वे क्रॉसिंगवर अडकली कार, पुढच्याच क्षणी ट्रेन आली आणि....हृदय पिळवटणारा VIDEO

Last Updated:

रेल्वेच्या आसपास उभं राहणं किंवा रेल्वे क्रॉसिंग ओलांडताना निष्काळजीपण जीवावर बेतू शकतो. त्यामुळे नेहमी सतर्क आणि काळजी घेण्यास सांगितली जाते. तरीही काही लोक असतात जे हलगर्जीपण करत स्वतःचा जीव धोक्यात घालतात.

रेल्वे क्रॉसिंगवर अडकली कार
रेल्वे क्रॉसिंगवर अडकली कार
नवी दिल्ली : रेल्वेच्या आसपास उभं राहणं किंवा रेल्वे क्रॉसिंग ओलांडताना निष्काळजीपण जीवावर बेतू शकतो. त्यामुळे नेहमी सतर्क आणि काळजी घेण्यास सांगितली जाते. तरीही काही लोक असतात जे हलगर्जीपण करत स्वतःचा जीव धोक्यात घालतात. सोशल मीडियावर अशा अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. अशाच आणखी एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आलाय, जो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.
रेल्वे ट्रॅक ओलांडताना एक कार अडकते. त्यानंतर कारपासून ट्रेन अगदी काही अंतरावरुन जाते. हे दृश्य श्वास रोखणारं आहे. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हिडीओ तुम्ही पाहू शकता, रेल्वे फाटक बंद असताना कार रेल्वे क्रॉसिंग करत आहे. अशा स्थितीत गाडी तिथेच अडकली. शेजारी लोकही उभे असलेले दिसतायेत. चालकाने गाडी रेल्वे रुळाच्या बाजूला उभी केली. तेवढ्यात ट्रेन आली आणि अगदी कारच्या जवळून गेली. सुदैवानं कुठलाही अपघात झाला नाही. हे दृश्य पाहताना मात्र अंगावर काटा येतो. व्हिडीओतील खूपच खरारक दृश्य आहे.
advertisement
advertisement
आनंद विहार ते मोतिहारीकडे जाणारी चंपारण सत्याग्रह एक्स्प्रेसचा हा व्हिडीओ आहे. @trainwalebhaiya नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 28 सेकंदांचा हा श्वास रोखणारा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसतायेत.
दरम्यान, रेल्वे स्टेशनवरील असे अनेक धोकादायक, भयानक व्हिडीओ समोर येत असतात. अनेकदा लोक आपल्या नियम उल्लंघण करताना आपल्या जीवाचाही विचार करत नाही.
view comments
मराठी बातम्या/Viral/
रेल्वे क्रॉसिंगवर अडकली कार, पुढच्याच क्षणी ट्रेन आली आणि....हृदय पिळवटणारा VIDEO
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement