Air India Crash Death : एअर इंडिया प्लेन क्रॅशमधील हा मृतदेह कुणाचा? सगळ्यांची ओळख पटली, पण याचे DNA सुद्धा जुळेल नाहीत
- Published by:Priya Lad
Last Updated:
Air India Plane Crash : एआय 171 विमान अपघातात डीएनए आणि चेहऱ्यांद्वारे आतापर्यंत 259 जणांची ओळख पटली आहे. फक्त एका मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
अहमदाबाद : एआय 171 विमान अपघाताला जवळजवळ दोन आठवडे झाले आहेत आणि या काळात राज्याच्या तज्ज्ञांनी आतापर्यंत एकूण 259 मृतदेहांची ओळख पटवली आहे, ज्यात 240 प्रवासी जे विमानात होते. तर 13 जणजमिनीवर अपघातात बळी पडले होते. 6 जणांची चेहऱ्यावरील आणि शारीरिक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळख पटवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की फक्त एका मृतदेहाची ओळख पटवता आलेली नाही, ज्याचा डीएनए अद्याप जुळलेला नाही.
बुधवारी एका ब्रिटीश नागरिकाचे अवशेष त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले. यासह आतापर्यंत एकूण 258 मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "फक्त एकच मृतदेह आमच्याकडे आहे , ज्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
advertisement
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, ज्या प्रवाशाची ओळख पटलेली नाही तो भारतीय नागरिक आहे, कारण विमानातील सर्व 52 ब्रिटिश नागरिक, 7 पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाची ओळख पटली आहे. अपघातातील एकमेव वाचलेल्या व्यक्तीचं नाव विश्वासकुमार रमेश आहे .
advertisement
गंभीरपणे जळालेल्या मृतदेहांमधून डीएनए काढण्याचा प्रयत्न फॉरेन्सिक तज्ज्ञ करत आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, "आम्ही कुटुंबाला जवळचा मार्ग दाखवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहोत . शेवटच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
advertisement
एनएद्वारे 253 लोकांची ओळख पटवणं हा एक विक्रम आहे. सर्व ओळख आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यात आली आहे. राज्य आरोग्य विभागाने असा दावा केला आहे की इतक्या कमी वेळात आली आहेत जेणेकरून मृतांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार आणि भरपाईची प्रक्रिया पूर्ण करता येईल.
Location :
Delhi
First Published :
June 26, 2025 11:46 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Air India Crash Death : एअर इंडिया प्लेन क्रॅशमधील हा मृतदेह कुणाचा? सगळ्यांची ओळख पटली, पण याचे DNA सुद्धा जुळेल नाहीत