भारताचे Shubhanshu shukla अंतराळात, पण तिथं करणार काय? Axiom 4 Mission भारतासाठी किती महत्त्वाचं?

Last Updated:

Shubhanshu shukla Axiom 4 mission : अ‍ॅक्सिओम-4 मिशन अंतर्गत 41 वर्षांनंतर भारताचा दुसरा अंतराळवीर अवकाशात झेपावला आहे. त्यामुळे भारतासाठी मोठी झेप आहे. पण शुभांशू शुक्ला तिथं काय करणार, हे मिशन भारतासाठी किती महत्त्वाचं आहे? असा प्रश्न पडतोच.

News18
News18
नवी दिल्ली : 25 जून 2025 हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला आहे. अमेरिकन व्यावसायिक अंतराळ कंपनी अ‍ॅक्सिओमने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) अ‍ॅक्सिओम-4 मिशन लाँच केलं आहे. भारताचे शुभांशू शुक्ला पायलट म्हणून या मोहिमेत सहभागी आहेत. 41 वर्षांनंतर भारताचा दुसरा अंतराळवीर अवकाशात झेपावला आहे. त्यामुळे भारतासाठी मोठी झेप आहे. पण शुभांशू शुक्ला तिथं काय करणार, हे मिशन भारतासाठी किती महत्त्वाचं आहे? असा प्रश्न पडतोच.
अ‍ॅक्सिओम कंपनीची सुरुवात 2016 मध्ये ह्युस्टन इथून नासाच्या दोन माजी शास्त्रज्ञ मायकेल टी. सुफ्रेडिनी आणि कॅम गफारियन यांनी केली होती. या कंपनीचं उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) मोहिमा पाठवणं होतं. यामध्ये त्यांनी इतर काही खाजगी कंपन्यांची आणि नासाची मदत घेण्यास सुरुवात केली.
अ‍ॅक्सिओमने यापूर्वी तीन मोहिमांद्वारे वेगवेगळ्या देशांतील प्रवाशांना अंतराळात पाठवलं आहे. यामध्ये इस्रायलचे पहिले अंतराळवीर आणि सौदी अरेबियाचे अंतराळवीर यांचा समावेश आहे. याशिवाय, या कंपनीने युरोपियन युनियन (EU) आणि अमेरिकन एजन्सी NASA सोबत अनेक आंतरराष्ट्रीय मोहिमा पार पाडल्या आहेत. अ‍ॅक्सिओम-4 मिशन हे अ‍ॅक्सिओम कंपनीचं चौथं मानवी अभियान आहे. जे नासा आणि स्पेसएक्सच्या मदतीने पार पाडलं जात आहे.
advertisement
या कंपनीने काही काळानंतर स्वतःचं अ‍ॅक्सिओम स्टेशन बांधण्याचंही उद्दिष्ट ठेवलं आहे. जे आयएसएसची जागा घेऊ शकेल. अ‍ॅक्सिओमने 2030 पर्यंत आपलं अंतराळ स्थानक प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य ठेवलं आहे.
अ‍ॅक्सिओम मिशन काय आहे, ते का महत्त्वाचं आहे?
अंतराळवीर त्यांच्या उद्दिष्टांनुसार आयएसएसवर 60 हून अधिक प्रयोग करतील. या प्रयोगांद्वारे मानवी शरीरावर अवकाश वातावरणाचा, अवकाशात शेतीचा आणि भौतिक विज्ञानाचा होणारा परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. अ‍ॅक्सिओम मिशन या अर्थाने देखील महत्त्वाचं आहे की ते सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमधील सहकार्य यशस्वीरित्या प्रदर्शित करू शकतं.
advertisement
अ‍ॅक्सिओम-४ मिशनमध्ये आयएसएसमध्ये पाठवल्या जाणाऱ्या लोकांमध्ये अमेरिका आणि भारताव्यतिरिक्त, पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीर देखील आयएसएसमध्ये जात आहेत, जे अनेक दशकांत पहिल्यांदाच घडले आहे.
याशिवाय अ‍ॅक्सिओम या मोहिमांद्वारे जगातील पहिले व्यावसायिक अंतराळ स्थानक बांधण्याबाबतची सर्व महत्त्वाची माहिती गोळा करण्यात गुंतले आहे. याद्वारे, कंपनी अवकाश क्षेत्रात काही निवडक देशांची मनमानी आणि हस्तक्षेप कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
advertisement
भारतासाठी अ‍ॅक्सिओम मिशन का महत्त्वाचं?
अ‍ॅक्सिओम-4 मिशनमध्ये अंतराळवीर पाठवण्यासाठी भारताने 550 कोटी रुपये गुंतवले आहेत. याद्वारे इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी तयार केलेल्या टीममध्ये खरा अवकाश अनुभव असलेल्या सदस्याची गरज पूर्ण केली जाईल.
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्या मते, या मिशनद्वारे, अंतराळातील प्रत्यक्ष प्रशिक्षण, तिथं उपलब्ध असलेल्या सुविधा आणि प्रयोग करण्याच्या पद्धती टीम सदस्यांद्वारे इतरांना योग्यरित्या कळतील. गगनयानच्या तयारीत हे महत्त्वाचे ठरेल.
advertisement
शुभांशू शुक्ला यांना शून्य गुरुत्वाकर्षण, मिशन प्रोटोकॉल आणि आयएसएसवरील मोहिमांमधील समस्यांचा थेट अनुभव मिळेल. त्यांच्या अनुभवांचा फायदा इस्रोला होईल आणि अवकाशात पाठवलं जाणारं पहिले मानवी मिशन योग्यरित्या तयार केलं जाईल.
एक प्रकारे अ‍ॅक्सिओम मिशन ही भारताच्या गगनयानसाठी एक चाचणी संधी असेल. उदाहरणार्थ, स्वदेशी अंतराळयानाच्या आवश्यकता काय असतील, अंतराळवीरांचे अन्न काय असेल आणि अंतराळात जाण्यासाठी हार्डवेअर कसे राखायचे याबद्दल माहिती उपलब्ध असेल.
मराठी बातम्या/देश/
भारताचे Shubhanshu shukla अंतराळात, पण तिथं करणार काय? Axiom 4 Mission भारतासाठी किती महत्त्वाचं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement