द ग्रेट खलीपेक्षाही उंची जास्त, किंमत 1 कोटी 11 लाख रुपये, 14 हजार प्रती लीटरच्या तुपाने होते मालिश
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
ak 56 horse : रुदल यादव हे या घोड्याचे मालक आहेत. याचे नाव ‘AK 56’ हे वेगाने प्रेरित होऊन ठेवले आहे. मात्र, या खास घोड्याच्या देखभालीवर दर महिन्याला 30-35 हजार रुपये खर्च होतात, असे त्यांनी सांगितले.
आशीष कुमार, प्रतिनिधी
पश्चिम चंपारण : आशियातील सर्वात मोठ्या प्राण्यांच्या बाजार हा सोनपूर येथे भरतो. सध्या येथील एक खास घोडा चर्चेत आहे. या घोड्याचे नाव कोणत्याही पौराणिक पात्रावर किंवा सूरज, चेतक किंवा बादल यांसारख्या पारंपारिक नावावर नाही. तर या घोड्याचे नाव हे ‘एके 56’ आहे. या घोड्याची उंची ही 7 फूट असून या घोड्याची किंमत ही तब्बल 1 कोटी 11 लाख रुपये आहे.
advertisement
‘AK 56’ नावासोबतची विशेष कहाणी -
रुदल यादव हे या घोड्याचे मालक आहेत. याचे नाव ‘AK 56’ हे वेगाने प्रेरित होऊन ठेवले आहे. सामान्य घोड्याच्या देखभालीसाठी महिन्याला 8 ते 10 हजारांचा खर्च येतो. मात्र, या खास घोड्याच्या देखभालीवर दर महिन्याला 30-35 हजार रुपये खर्च होतात, असे त्यांनी सांगितले.
‘AK 56’ हा घोडा सिंधी जातीचा आहे. हा आपल्या सहनशीलता आणि मालकाप्रती प्रामाणिकपणासाठी ओळखला जातो. याची उंची ही 64 इंच असते. मात्र, ‘AK 56’ या घोड्याची उंची ही 66 इंच आहे. हा खास घोडा फक्त साडे चार वर्षाच्या वयातच इतका मोठा झाला आहे.
advertisement
रुदलचे भाऊ अनिल यादव यांनी पुढे सांगितले की, या घोड्याला वयाच्या एक वर्षापासून प्रशिक्षण देण्यात आले होते. आता हा घोडा न थकता दीर्घकाळ चालण्यास आणि धावण्यास सक्षम आहे. हा घोडा ताशी 45 किमी वेगाने धावतो. मात्र, पूर्ण वेगाने तो ताशी 100 किमीपर्यंत पोहोचू शकतो.
advertisement
विशेष पद्धतीने या घोड्याची काळजी घेतली जाते. मादी मेंढ्यांच्या तुपाने आठवड्यातून दोनदा घोड्याची मालिश केली जाते. या तुपाची किंमत 14 हजार रुपये प्रति लीटर आहे. घोड्याच्या मसाजसाठी दर महिन्याला सुमारे 2 लीटर तूप वापरले जाते. तसेच ‘एके 56’ च्या आहारात उच्च दर्जाच्या पोषक तत्वांचाही समावेश केला जातो, अशी माहिती त्यांनी दिली.
view commentsLocation :
Bihar
First Published :
November 20, 2024 8:35 PM IST
मराठी बातम्या/Viral/
द ग्रेट खलीपेक्षाही उंची जास्त, किंमत 1 कोटी 11 लाख रुपये, 14 हजार प्रती लीटरच्या तुपाने होते मालिश


