Animal Video : सिंह-सिंहिणींनी अडवला रस्ता, खतरनाक दृश्य पाहून बसेल धक्का!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
जंगलामध्ये एकापेक्षा एक धोकादायक आणि भयानक प्राणी आढळतात. प्राण्यांच्या हल्ल्यात कोणतीही व्यक्ती वाचणं खूप कठिण आहे. त्यामुळे प्राण्यांपासून लोक दहा हात दूरच राहतात.
नवी दिल्ली : जंगलामध्ये एकापेक्षा एक धोकादायक आणि भयानक प्राणी आढळतात. प्राण्यांच्या हल्ल्यात कोणतीही व्यक्ती वाचणं खूप कठिण आहे. त्यामुळे प्राण्यांपासून लोक दहा हात दूरच राहतात. कारण प्राणी कधी हल्ला करेल आणि जीव घेईल सांगता येत नाही. सध्या एक व्हिडीओ समोर ज्यामध्ये रस्त्यावर सिंह-सिंहिणींनीचा ग्रुप निवांत फिरताना दिसतोय. हे दृश्य पाहून अंगावर काटा उभा राहिल.
सिंह-सिंहणींच्या हल्ल्याविषयी तर बोलायलाच नको. अचानक हे प्राणी समोर आले किंवा तुमचा रस्ता अडवला तर काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. असंच काहीसं दृश्य समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय. व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंह आणि सिंहिणींचा एक गट रस्त्यावर फिरत आहे. अनेक वाहने त्यांच्यामुळे थांबली आहेत. सर्व लोकांनी वाहने लॉक केली आहेत आणि सर्वजण गाड्यांमध्ये लपले आहेत. या कारमध्ये बसलेल्या लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हे दृश्य पाहिल्यावर कोणालाही धक्का बसेल, कोणीही घाबरेल.
advertisement
You’re sitting in traffic and you see this. What’s your next move? pic.twitter.com/NZd9xRoYYw
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) January 28, 2024
@AMAZlNGNATURE नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 15 सेकंदांचा हा व्हिडीओ खूप खतरनाक असून चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे. जंगल सफारीवर गेल्यावर लोक त्यांना पाहण्यासाठी पैसे भरतात तुम्ही फ्रीमध्ये बघून घ्या, अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. अनेकांनी गाड्या व्यवस्थित लॉक करण्याचा सल्ला दिला. प्राण्यांचे असे भयानक, खतरनाक व्हिडीओ समोर येत असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2024 9:44 PM IST









