स्टेशनवर थांबली ट्रेन, प्लॅटफॉर्मवर उतरलं कपल, नाव ऐकताच जीआरपी पोलिसांची पळापळ

Last Updated:

दोघंही प्लॅटफॉर्मच्या बाहेर आले आणि ताजमहाल पाहण्यासाठी गेले. ताजमहाल पाहण्यासाठी दोघंही आतूर होते. पण ताजमहालला पोहोचण्यापूर्वी अचानक त्यांना आठवलं की...

प्रतीकात्मक फोटो (AI Generated image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated image)
आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबली. या ट्रेनमधून एक कपल उतरलं. दोघंही प्लॅटफॉर्मच्या बाहेर आले आणि ताजमहाल पाहण्यासाठी गेले. ताजमहाल पाहण्यासाठी दोघंही आतूर होते. पण ताजमहालला पोहोचण्यापूर्वी अचानक त्यांना आठवलं की त्यांची पर्स रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच ते विसरले. त्यांनी लगेच जीआरपी पोलिसांना फोन केला आणि आपलं नाव सांगून आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांची धावपळ सुरू झाली.
मोहम्मद नूर मोहसीन आणि सुरैया यास्मिन असं या कपलचं नाव. बांगलादेशातील हे कपल 26 जानेवारीला भारतात ताजमहालला भेट देण्यासाठी आले. ते आपली पर्स आग्रा कँट रेल्वे स्थानकावर विसरले. त्यांनी जीआरपी पोलिसांना याची माहिती दिली. मोहम्मद नूर मोहसीनने फोनवर पोलिसांना सांगितलं की मी बांगलादेश सरकारमध्ये सीजेएम आहे. माझी पत्नी एडीएम पदावर कार्यरत आहे. मी माझी पर्स आग्रा रेल्वे स्टेशनवर विसरलो आहे.
advertisement
बांगलादेशी दाम्पत्याची पर्स हरवल्याची बातमी समजताच संपूर्ण रेल्वे स्थानकात खळबळ उडाली. जीआरपी पोलिसांनी पर्सचा शोध सुरू केला आहे. जीआरपी पोलिसांना एका तासाभरात बांगलादेशी दाम्पत्याची हरवलेली पर्स सापडली, पर्समध्ये मालमत्ता पासपोर्ट आणि हजारो रुपयांची रोकड ठेवण्यात आली होती.
advertisement
माहितीवरून जीआरपी पोलिसांनी पुराचा शोध घेण्यासाठी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि लोकांची चौकशी केली. तासाभरात पोलिसांना हरवलेली पर्स सापडली. पोलिसांनी ती पर्स एका मुलाकडून जप्त केली. ज्या मुलाकडे ही पर्स होती तोही या पर्यटकांचा शोध घेत होता. पर्समध्ये पती-पत्नीचे पासपोर्ट, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रं ठेवण्यात आली होती.
advertisement
जीआरपी पोलिसांचे एसपी अभिषेक वर्मा यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत सांगितलं की, 26 जानेवारीला संध्याकाळी जीआरपी आग्रा पोलिसांना माहिती मिळाली होती की, बांगलादेशातून ताजमहालला भेट देण्यासाठी रेल्वे स्टेशनवरून आलेल्या एका जोडप्याची पर्स कोणीतरी काढून घेतली आहे. माहिती मिळताच जीआरपी पोलिसांनी पर्सचा शोध सुरू केला आणि सुमारे तासाभरात तिची पर्स जप्त करून तिच्या ताब्यात दिली.
advertisement
हरवलेली पर्स सापडल्यानंतर या जोडप्याने उत्तर प्रदेश सरकार तसंच आग्रा जीआरपी पोलिसांचे आभार मानले. आग्रा जीआरपी पोलीस दररोज पर्यटकांच्या हरवलेल्या वस्तूंचा शोध घेऊन त्यांना परत करत आहेत.
मराठी बातम्या/Viral/
स्टेशनवर थांबली ट्रेन, प्लॅटफॉर्मवर उतरलं कपल, नाव ऐकताच जीआरपी पोलिसांची पळापळ
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement