बायकोच्या साबणाने अंघोळ करणं पडलं भारी, नवऱ्याला पोलिसांनी केली अटक, प्रकरण काय?

Last Updated:

Husband arrested bath with wife soap : हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. कुणाच्याही साबणाने अंघोळ केली म्हणून अटक कशी काय होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

News18
News18
लखनऊ : आपल्या दैनंदिन जीवनातील अशा काही गोष्टी असतात ज्या फक्त आपणच वापरतो. आपण दुसऱ्याला देत नाही आणि दुसऱ्याचं वापरत नाही. विशेषतः पर्सनल हायजिन केअरच्या वस्तू, जसं की टुथब्रश, साबण, टॉवेल. जर कुणी या वस्तू दुसऱ्याने वापरल्या तर अनेकांना ते आवडत नाही. काहींना तर खूप राग येतो. अशीच एक व्यक्ती जिनं आपल्या बायकोचा साबण वापरला पण त्याला हे भारी पडलं. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
advertisement
उत्तर प्रदेशच्या अलिगडमधील हे अजब प्रकरण आहे. पत्नीच्या साबणाने अंघोळ केली म्हणून पतीला अटक करण्यात आली आहे. हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. कुणाच्याही साबणाने अंघोळ केली म्हणून अटक कशी काय होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरंतर साबणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की पोलिसांना बोलवावं लागलं.
advertisement
उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये साबणावरून पती-पत्नीमध्ये वाद इतका वाढला की पोलिसांना पाचारण करावे लागले. त्या व्यक्तीने पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला आहे, तर पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि शांतता भंग केल्याबद्दल त्या व्यक्तीवर कारवाई केली आहे. ही घटना कुरसी पोलिस स्टेशन परिसरातील रावण टीला परिसरातील आहे.
advertisement
संजय गांधी कॉलनीतील रहिवासी प्रवीणचं 13 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. शुक्रवारी सकाळी प्रवीण बाथरूममध्ये आंघोळ करत होता. त्याने पत्नीचा साबण वापरला. यावरून पती-पत्नीत वाद झाला. प्रवीणची आई पुष्पाने सुनेने आपल्या मुलाला विटेने मारल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर प्रवीणने तिला मारहाण केली. सुनेनं आपल्या आईवडिलांना सांगितलं. त्यांनी पोलिसांना कळवलं आणि पोलीस घरी आले.
advertisement
प्रवीणने सांगितलं की मी पोलिसांना बोललो मी येतो, मी पळून जाणार नाही. हे ऐकताच एका पोलिसाने त्याला चापट मारली. म्हणून प्रवीणीने शिवीगाळ गेली. यावरून संतप्त झालेल्या पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेलं आणि काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. ज्यामुळे त्याच्या बोटाला दुखापत झाली.
advertisement
तर पोलीस म्हणाले की प्रवीणने पोलिसांशी अपशब्द वापरले. पोलिसांनी तरुणाला मारहाण केलेली नाही. या संदर्भात खोटे आरोप करण्यात आले आहेत.
नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार सीओ सर्वम सिंह यांच्या म्हणण्यानुसार पत्नीने आरोप केला होता की पती तिला शिवीगाळ करत होता आणि मारहाण करत होता. शांतता भंग केल्याबद्दल पोलिसांनी तरुणावर कारवाई केली आहे. पती-पत्नी दोघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
बायकोच्या साबणाने अंघोळ करणं पडलं भारी, नवऱ्याला पोलिसांनी केली अटक, प्रकरण काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement