वेडिंग ड्रेससाठी नवऱ्याचा अजब हट्ट; कारण ऐकून नवरीच्या पायाखालची जमीनच सरकली

Last Updated:

सुरुवातीला तरुणीला वाटलं की तिचा होणारा नवरा कलात्मक आहे आणि कदाचित तो फोटोमध्ये चांगलं दिसण्यासाठी असं करत असेल. पण जेव्हा तिनं त्याचं कारण विचारलं आणि त्याने उत्तर दिलं तेव्हा तिला धक्काच बसला.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : लग्न म्हटलं की खास असतो तो नवरा-नवरीचा ड्रेस. आपण आपल्या लग्नात कोणती आणि कशी साडी नेसणार किंवा कोणता वेडिंग ड्रेस घालणार याचं स्वप्न कित्येक महिला आधीपासूनच पाहतात. अशीच एक तरुणी जिला तिच्या लग्नात व्हाइट वेडिंग ड्रेस घालायचा होता. पण तिच्या नवऱ्याने वेडिंग ड्रेससाठी नको तो हट्ट केला. त्याच्या अजब हट्टाचं कारण समजल्यानंतर तिला धक्काच बसला.
अमेरिकेतील हे विचित्र प्रकरण आहे. एका तरुणीच्या लग्नाचा ड्रेस निवडताना एक विचित्र घटना घडली. तिला तिच्या लग्नात तिच्या आवडीचा पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालायचा होता. पण तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला पांढऱ्या ड्रेसऐवजी लाल ड्रेस घालण्याचा आग्रह धरला. मात्र आश्चर्याची गोष्ट तेव्हा घडली जेव्हा त्याने लाल रंगावर भर देण्याचं कारण सांगितलं.
लग्नाच्या ड्रेसवरून नवरा-नवरीत वाद
लग्नाच्या तयारीत असलेल्या या मुलीने सोशल मीडियावर आपली कहाणी शेअर केली आहे. तिनं सांगितलं, आम्ही सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये आहोत. आता लग्नाच्या तयारत होतो. लग्नाची बहुतेक तयारी मी करत आहे. मला लग्नासाठी पांढरा ड्रेस घालायचा होता पण त्याला लाल हवा होता.
advertisement
मुलगी म्हणाली, "मी सहा वर्षे माझ्या मंगेतरसोबत होते आणि आठ महिन्यांपूर्वी आमची लग्ने झाली आणि लग्नाच्या तयारीत होतो. लग्नाचे बहुतेक नियोजन मी करत होतो." जेव्हा ड्रेसच्या रंगावरून वाद सुरू झाला तेव्हा मंगेतराने सांगितले की तो त्याच्या कार्यालयातील सहकाऱ्यांशी बोलत आहे आणि काहींनी त्याला सांगितले की तिने पांढरा ड्रेस घालू नये.
advertisement
लग्नाच्या ड्रेसवरून वादाचं खरं कारण काय?
सुरुवातीला मुलीला वाटलं की तिचा होणारा नवरा कलात्मक आहे आणि कदाचित तो फोटोमध्ये चांगलं दिसण्यासाठी असं करत असेल. पण जेव्हा तिनं त्याचं कारण विचारलं आणि त्याने उत्तर दिलं तेव्हा तिला धक्काच बसला. जेव्हा ड्रेसच्या रंगावरून वाद सुरू झाला तेव्हा तिच्या होणाऱ्या सांगितले की तो त्याच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी बोलत आहे आणि काहींनी त्याला सांगितलं की तिनं पांढरा ड्रेस घालू नये.
advertisement
होणाऱ्या नवऱ्याचं उत्तर ऐकून नवरीला विचित्र वाटलं. तिनं पांढरा ड्रेसच घेतला तेव्हा नवरदेवानं नाराजी व्यक्त केली. फक्त वधू फक्त शुद्ध म्हणजेच कुमारी असतानाच पांढरे कपडे घालतात, असं त्याचं म्हणणं होतं. यामुळे मुलगी खूप दुःखी झाली आणि आता तिला अशा व्यक्तीशी लग्न करावं की नाही असा प्रश्न पडला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर तिनं आली ही स्टोरी शेअर केल्यानंतर अनेकांनी तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याला डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी लाल चिन्हाचा अर्थ म्हणजे तिनं अशा पुरुषाशी लग्नच करू नये, असं म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
वेडिंग ड्रेससाठी नवऱ्याचा अजब हट्ट; कारण ऐकून नवरीच्या पायाखालची जमीनच सरकली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement