Thane News: मापात पाप केलं म्हणून कोर्टात नेलं, चहावरुन थेट कॅन्टीनवर खटला
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Thane News: ठाणे स्टेशनवर 30 मिली चहा कमी दिल्याने थेट कॅन्टीनवर खटला दाखल करण्यात आला आहे. वैधमापनशास्त्र विभागाने ही कारवाई केली.
ठाणे : मापात पाप केलं की कारवाई होते हे अनेकांना माहिती असेल. पण चहा कमी दिला म्हणून कॅन्टीलाच कोर्टात खेचल्याचं कुणी ऐकलंय का? ठाण्यात असा प्रकार घडला आहे. 30 मिली चहा कमी दिला म्हणून रेल्वे स्टेशनवरील चहा कॅन्टीनला थेट कोर्टात खेचलंय. ठाणे रेल्वे स्टेशनवर वैधपापनशास्त्र विभागाने ही कारवाई केली असून त्याची सर्वत्र चर्चा आहे.
नेमकं घडलं काय?
ठाणे रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक 6 व 7 वरील कॅन्टीनवर चहा घेतला असता तो 150 मिली देणे अपेक्षित होते. मात्र, त्यात 30 मिली चहा कमी होता. वैधमापनशास्त्र विभागाने थेट कारवाई करत संबंधित कॅन्टीन चालकाला रंगेहाथ पकडले. त्यानुसार कोकण विभागीय सहसंचालक शिवाजी काकडे यांच्या मार्गदर्शनात फलाटावरील कॅन्टीन मालकाविरोधात खटला दाखल केला आहे. वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक रा. फ. राठोड यांनी याबाबत माहिती दिलीये.
advertisement
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या नियंत्रणातील या वैधमापनशास्त्र यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी ठाणे स्टेशन परिसरातील कॅन्टीनवर अचानक छापा टाकला. यावेळी चहाच्या मापनासह त्यांच्या वजन काट्याची कायदेशीर तपासणी केली. यामध्ये फलाट क्रमांक सहा, सातवरील कॅन्टीनवर त्यांनी चहा घेतला असता त्यात 150 मिली चहाऐवजी 120 मिली चहाच असल्याचे उघड झाले. चहाच्या कपात 30 मिली चहा कमी असल्याने या कॅन्टीनच्या मालकावर खटला दाखल केला.
advertisement
वजनकाटा तपासून घेतला नाही
फलाट क्रमांक 2 वरील कॅन्टीनमध्ये असलेला वजनकाटा शासन यंत्रणेकडून तपासून घेतला नाही. त्यामुळे या मालकावरही खटला दाखल झाला आहे. नि. म. गोस्वामी, भा. जाधवर आणि गौ. म. जिरगे, आदी निरीक्षकांनी ही कारवाई केल्याचे, राठोड यांनी सांगितले.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
April 25, 2025 12:34 PM IST