advertisement

जागेवरुन झाला वाद, लाथाबुक्क्या मारत हाणामारी; मेट्रोमधील भांडणाचा Video

Last Updated:

मेट्रोमध्ये नेहमीच गर्दी असते. रोज हजारो-लाखो लोक मेट्रोनं प्रवास करतात. त्यामुळे प्रचंड गर्दी तर पहायला मिळतेच सोबत मेट्रोमध्ये अनेक भांडण, हाणामारीही पहायला मिळते.

मेट्रोमधील भांडणाचा Video
मेट्रोमधील भांडणाचा Video
नवी दिल्ली : मेट्रोमध्ये नेहमीच गर्दी असते. रोज हजारो-लाखो लोक मेट्रोनं प्रवास करतात. त्यामुळे प्रचंड गर्दी तर पहायला मिळतेच सोबत मेट्रोमध्ये अनेक भांडण, हाणामारीही पहायला मिळते. गर्दीमुळे लोकांमध्ये अनेक वाद होत असतात, कधी चोरी, डान्स व्हिडीओ, स्टंट व्हिडीओ, जागेवरुन हाणामारी, अश्लील चाळे, अशा अनेक घटना समोर येत असतात. अशातच आणखी एक मेट्रोतील हाणामारीचा व्हिडीओ समोर आलाय. जागेवरुन दोन तरुणांमध्ये तुफान भांडण झालं.
मेट्रोमध्ये खचाखच गर्दी तर कायमच असते. त्यामुळे सीटवरुन अनेक वाद होताना पहायला मिळतात. कधी महिलांमध्ये वाद तर कधी पुरुषांची हाणामारी. अशा घटनांचे अनेक व्हिडीओही समोर येत असतात. असाच आणखी एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये जागेवरुन तिघांमध्ये जोरदार भांडण झालं. त्यानंतर त्यांच्या भांडणाचा कोणीतरी व्हिडीओ शूट केला जो सध्या तुफान व्हायरल होतोय.
advertisement
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जागेवरून तिन तरुणांमध्ये सुरुवातीला बाचाबाची होते. त्यानंतर हाणामारी, लाथामुक्क्या मारल्या जातात. खांबला लटकूनही व्यक्ती लाथा मारताना दिसत आहे. दिल्ली मेट्रोतील हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलीच खळबळ माजवतोय.
advertisement
@gharkekalesh नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 25 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. व्हिडीओवर अनेक कमेंचही येताना दिसत आहेत.
दरम्यान, दिल्ली मेट्रोमध्ये असा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक भांडणाचे व्हिडीओ समोर आले आहेत. आता दिल्ली मेट्रोमध्ये या गोष्टी रोजच्या झाल्या आहेत त्यामुळे लोकांनाही याची सवय झालीय.
view comments
मराठी बातम्या/Viral/
जागेवरुन झाला वाद, लाथाबुक्क्या मारत हाणामारी; मेट्रोमधील भांडणाचा Video
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement