Real Ghost Story : धरता येईना अन् सोडता येईना! भुताने कपलचा केला भलताच वांदा; अशा स्थितीत लागतंय झोपायला
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
या कपलच्या सुखी संसारात एका भुताची एंट्री. त्यानंतर या कपलची भलतीच अवस्था झाली आहे.
पॅरिस, 31 ऑगस्ट : पॅरानॉर्मल म्हणजे नेहमीच्या विश्वापेक्षा काही विचित्र, वेगळ्या गोष्टी घडतात किंवा भुताखेतांच्या गोष्टी यावर अनेकांचा विश्वास नसतो; मात्र फ्रान्समधल्या रेप्लॉंजेस शहरातल्या एका जोडप्याने 2020 साली असा एक विचित्र, अविश्वसनीय अनुभव घेतला. या कपलच्या सुखी संसारात झाली ती एका भुताची एंट्री. त्यानंतर या कपलची भलतीच अवस्था झाली आहे.
पॅट्रिशिया आणि डेव्हिड हे दाम्पत्य काही वर्षांपूर्वीच बांधलेल्या एका अपार्टमेंटमध्ये राहायला गेलं. 2016मध्ये बांधलेली ती इमारत खूप स्वच्छ आणि हवेशीर वगैरे होती; पण त्यांना आलेला अनुभव मात्र वाईट होता. पॅट्रिशिया आणि डेव्हिडला मात्र या घरात विचित्र अनुभव आले. काळ्या सावल्यांपासून ते सारं सुरू झालं. त्यानंतर ते लाइट्स, टीव्ही आपोआप बंद होण्याचे प्रकार घडू लागले. भांडी आपोआप हलू लागली, फोन स्वतःहूनच काही तरी करायचा, असे अनुभव या दाम्पत्याने शेअर केले.
advertisement
त्यांना जागा सोडण्याचेही सल्ले मिळाले; मात्र पॅरानॉर्मल अनुभव हे भाडेकरार मोडण्याचं वैध कारण होऊ शकतं का, असा प्रश्न होता. या कारणामुळे त्यांचं आयुष्य चिंताग्रस्त बनलं. त्यामुळे त्यांनी अपार्टमेंटच्या बाल्कनीत तंबू ठोकून तिथे राहायला सुरुवात केली. हे दाम्पत्य महिनाभर बाल्कनीत झोपायचं. थंडीत तिथे राहणं शक्य नसल्याने त्यांनी अखेर पॅरानॉर्मल विषयातल्या तज्ज्ञाला पाचारण करून कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
advertisement
त्या तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार, या दाम्पत्याच्या घरात राहणारं भूत 19व्या शतकातल्या एका महिलेचं होतं. या दाम्पत्याला घराबाहेर काढण्याचे प्रयत्न ते करत होतं; मात्र ही माहिती या दाम्पत्याला मिळाली तरी त्यांना शांत होण्यास ती पुरेशी नव्हती. शेवटी त्यांनी स्वतःच्या वस्तू अपार्टमेंटमधल्या कॅबिनेट्समध्ये ठेवणं बंद केलं. त्याऐवजी बॉक्सेस वापरू लागले. कारण अन्यथा बूट, कपडे वगैरे सगळं फेकून दिलं गेल्याचा अनुभव यायचा.
advertisement
'शोबिझ डेली'च्या वृत्तानुसार हे दाम्पत्य राहायला जाण्याआधी ते घर दोघांना भाड्याने दिलेलं होतं. त्या दोघांना मात्र कोणतेही विचित्र, पॅरानॉर्मल अनुभव आले नव्हते, असं ले प्रोग्रेस या फ्रेंच मॅगझिनच्या वृत्तात म्हटलं आहे.
एप्रिल 2011मध्ये फ्रान्समध्ये नान्तेस इथे महिला आणि तिच्या चार मुलांना कुटुंबप्रमुखाने ठार करून पुरलं होतं. अशा घराची पुन्हा विक्री कशी होऊ शकेल? घटनेनंतर चार वर्षांपर्यंत म्हणजे 2015पर्यंत ते विकलं गेलं नाही. त्या काळात त्याची किंमत 4,90,000 वरून 2,90,000 युरोवर आली. 2019मध्ये घराचं नूतनीकरण करून ते 4,79,000 युरोला विकण्यात आलं. शोकांतिकेनंतरची ती दुसरी विक्री होती. म्हणजेच पहिल्या खरेदीदारांना कदाचित काही वेगळे अनुभव आलेले असू शकतात.
advertisement
याला अंधश्रद्धा म्हणावं की फँटसी? अशी जागा सोडण्यावाचून पर्याय नसतो हेच खरं आणि त्यासाठी पैसे नसतील, तर त्याच्याशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही.
Location :
Delhi
First Published :
Aug 31, 2023 11:42 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Real Ghost Story : धरता येईना अन् सोडता येईना! भुताने कपलचा केला भलताच वांदा; अशा स्थितीत लागतंय झोपायला










