Marriage : सासरच्या उंबरठ्यावर पोहोचताच 20 मिनिटात नववधूनं मोडलं लग्न; सुहागरातपूर्वीच माहेरी परतली मुलगी, असं काय घडलं?

Last Updated:

25 नोव्हेंबर रोजी देवरिया शहरातील एका मॅरेज हॉलमध्ये मोठ्या थाटात विवाह पार पडला. मिरवणूक आली, वधू पक्षाने त्यांचे पुष्पमाला घालून स्वागत केले, द्वारपूजा झाली, जयमालेचा सोहळा रंगला आणि पहाटेपर्यंत लग्नविधी पार पडले.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
देवरिया, उत्तर प्रदेश: लग्न म्हणजे दोन कुटुंबांना जोडणारा, 7 जन्मांची वचनं देणारा पवित्र सोहळा. भारतीय संस्कृतीत या विधीला खूप महत्त्व आहे आणि त्यासाठी दोन्हीकडील कुटुंबं मोठा खर्च करून, उत्साहाने तयारी करतात. असाच एक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. वधू-वर पक्षाने एकमेकांचे स्वागत केले, रात्रभर लग्नविधी उत्साहात पूर्ण झाले आणि वधूची पाठवणीही झाली. पण नववधू जेव्हा सासरच्या घरी पोहोचली, तेव्हा अवघ्या 20 मिनिटांत तिने घेतलेल्या एका निर्णयाने केवळ नवऱ्याचेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य हादरवून टाकले. ज्यामुळे ही घटना चर्चेचा विषय बनली.
देवरियातील भलुआनी गावात राहणाऱ्या हर्ष चंद्र मद्धेशिया यांच्या मुलाचे लग्न सलेमपूर येथील एका मुलीशी सहा महिन्यांपूर्वी ठरले होते. 25 नोव्हेंबर रोजी देवरिया शहरातील एका मॅरेज हॉलमध्ये मोठ्या थाटात विवाह पार पडला. मिरवणूक आली, वधू पक्षाने त्यांचे पुष्पमाला घालून स्वागत केले, द्वारपूजा झाली, जयमालेचा सोहळा रंगला आणि पहाटेपर्यंत लग्नविधी पार पडले.
advertisement
बुधवारी दुपारी ही नववधू आपल्या सासरी गेली. परिसरातील स्त्रियांनी तिचे घरात स्वागत केले. अजून अनेक महिलांना वधूचा चेहरा धड पाहता आला नव्हता, तेवढ्यात तिने घराच्या उंबरठ्याबाहेर येऊन एक धक्कादायक घोषणा केली. तिने स्पष्टपणे सांगितले, "मी या घरात राहणार नाही."
नव्या नवरीचे हे बोल ऐकून उपस्थित महिला आणि सासरकडचे लोक अक्षरशः स्तब्ध झाले. सर्वांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिने तातडीने आपल्या माहेरच्या लोकांना बोलावण्याची मागणी केली.
advertisement
नवरा विशालने आपल्या सासरच्यांना फोन करून बोलावले. थोड्याच वेळात वधूचे आई आणि भाऊ तिथे पोहोचले. त्यांनीही मुलीला खूप समजावले, कारण विचारले, पण नववधूने कोणाचेही ऐकले नाही. तिने फक्त एकच हट्ट धरला, की तिला आपल्या माहेरच्या घरी परत जायचे आहे.
या अनपेक्षित घटनेमुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. विशालने सांगितले की, लग्न ठरल्यापासून सर्व काही व्यवस्थित होते. आमचे फोनवर बोलणेही होत असे, पण तिने कधीही लग्न मोडण्याबद्दल किंवा नाखूश असल्याबद्दल संकेत दिले नव्हते. "आम्ही मोठ्या थाटामाटात लग्न केले, घरभर आनंद होता. पण तिने आमच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरले. जर तिला हे लग्न मान्य नव्हते, तर तिने आधीच सांगायला हवे होते," असे म्हणत विशालने आपली खंत व्यक्त केली.
advertisement
विशाल आणि त्याच्या कुटुंबियांनी तिला वारंवार 'नकार' देण्याचे कारण विचारले, पण वधूने शेवटपर्यंत 'कारण' सांगितले नाही. घरात जमलेल्या सगळ्या नातेवाईकांच्या आणि लोकांच्या समोर तिने केवळ माहेरला जाण्याची आणि विशालसोबत न राहण्याची जिद्द धरली.
शेवटी, ही समस्या सोडवण्यासाठी ५ तास पंचायत चालली. दोन्ही कुटुंबांतील सदस्य आणि प्रतिष्ठित लोक तिथे उपस्थित होते. एवढा वेळ समजावूनही नववधू आपल्या निर्णयापासून जराही हलली नाही. शेवटी, दोन्ही पक्षांनी आपापले संबंध संपवण्याचा कठोर निर्णय घेतला.
advertisement
या निर्णयानुसार, लिखापढी (कायदेशीर कागदपत्र) करण्यात आली आणि दोन्ही पक्षांनी त्यावर सह्या केल्या. लग्नात दिलेले सर्व सामान आणि वस्तू परत करण्यात आले आणि या नात्याला पूर्णविराम मिळाला. सुहागरात्रीच्या (Honeymoon) आधीच नववधू आपल्या माहेरच्या घरी परतली. या घटनेमुळे संपूर्ण देवरिया परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. विशाल आणि त्याच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. "आमच्या सगळ्या कुटुंबाची इज्जत मातीमोल झाली," अशी भावना विशालने व्यक्त केली.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Marriage : सासरच्या उंबरठ्यावर पोहोचताच 20 मिनिटात नववधूनं मोडलं लग्न; सुहागरातपूर्वीच माहेरी परतली मुलगी, असं काय घडलं?
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement