तुम्हीही बाहेर बनवलेले पापड खाताय? मग हा किळसवाणा VIDEO पाहाच
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
आजकाल लोकांना बाहेरचं खायला जास्त आवडतं. त्यामुळे बऱ्याचवेळा लोक बाहेर बनवलेले पदार्थ खातात किंवा ऑनलाईन ऑर्डर करतात.
नवी दिल्ली : आजकाल लोकांना बाहेरचं खायला जास्त आवडतं. त्यामुळे बऱ्याचवेळा लोक बाहेर बनवलेले पदार्थ खातात किंवा ऑनलाईन ऑर्डर करतात. मात्र बाहेर बनवलेल्या पदार्थांमध्ये काहीतरी खराब गोष्टी निघतात किंवा बनवताना स्वच्छतेची काळजी घेतली नाही. असे खाद्यपदार्थ बनवतानाचे बरेच व्हिडीओ समोर येत असतात ज्यामध्ये एकदम गलिच्छपणा दिसून येतो. ते पाहून पुन्हा खाण्याची इच्छा होत नाही. असाच आणखी एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये पापड बनवले जात आहेत. मात्र प्रोसेस पाहून पुन्हा खाण्याची इच्छा निघून जाईल.
भरपूर लोक पापड घरी बनवण्याऐवजी विकतचे पापड घेतात. मात्र विकत पापड कसे बनवले जाता हे तुम्हाला माहितीय का? एका कारखान्यातील पापड बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडीओ पाहून किळस येईल आणि पापड खाण्याची इच्छा जाईल.
पापड बनवतानाच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कारखान्यात पापड बनवले जात आहेत. सुरुवातीला एका भांड्यात पापडाचं पीठ बनवलं जातं. मात्र ते एवढं स्वच्छ दिसत नाही. त्यानंतर एकाद्या रोटीप्रमाणे त्याला शिजवलं जातं. मग हे पोठे पापड कापण्यासाठी महिला एक छोटं भांडं घेते आणि त्यावर उभी राहते. पायांनी जोर लावत ती पापड कापते. ते पाहून किळसवाणं वाटतं.
advertisement
advertisement
ज्याच्यावर हे पापड वाळत घातलेले आहे तेदेखील स्वच्छ दिसत नाहीये. त्यामुळे पापड बनवण्याची ही प्रोसेस पाहून तुम्हालाही खाण्याची इच्छा जाईल. dabake_khao नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताच इंटरनेटवर खळबळ माजवताना दिसला. व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून अनेकांनी स्वच्छतेविषयी संताप व्यक्त केलाय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 03, 2024 8:15 PM IST








