Jugaad Video : घरभर फिरवा फक्त प्लॅस्टिक बाटली, काही तासात घर चकाचक होईल

Last Updated:

पाणी किंवा कोल्ड ड्रिंक च्या बाटल्या रिकाम्या झाल्या की शक्यतो त्या आपण कचर्‍यात फेकतो. पण ही बाटली इतकी कामाची आहे की तुम्ही विचारही केला नसाल. दिवाळीत साफसफाई सारखं मोठं मेहनतीचं काम या बातमीमुळे हलकं होईल.

News18
News18
नवी दिल्ली : दसरा तोंडावर आला आहे. काही दिवसांनी दिवाळी येईल. दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई आलीच. यासाठी आपण झाडू, मॉप असे क्लिनिंग टूल वापरतो. पण तुम्ही कधी साफसफाई करताना प्लॅस्टिक बाटलीचा वापर केला आहे का? या जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाणी किंवा कोल्ड ड्रिंक च्या बाटल्या रिकाम्या झाल्या की शक्यतो त्या आपण कचर्‍यात फेकतो. पण ही बाटली इतकी कामाची आहे की तुम्ही विचारही केला नसाल. दिवाळीत साफसफाई सारखं मोठं मेहनतीचं काम या बातमीमुळे हलकं होईल. आता ते कसं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग पाहूयात.
नेमकं करायचं काय?
प्लॅस्टिक बाटली घ्यायची. त्यावरील लेबल काढून टाकयचं. एक लांब पाइप, काठी किंवा दांडा घ्या. हा पाईप बाटलीत जाईल असा होल बाटलीच्या मधोमध पाडा. त्यात पाईप घुसवा. बाटली हलणार नाही अशा पद्धतीने  ती पाइपवर घट्ट बसवा.
advertisement
एक जुना टीशर्ट पाण्यात भिजवून घ्या आणि तो त्या पाइपला लावलेल्या बाटलीला गुंडाळा.
इथं पाहा व्हिडिओ
Ayeshas kitchen hack यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
advertisement
याचा फायदा काय?
हा तुमचा होममेड क्लीनर वाइप तयार झाला. हा तुम्ही जमिनीवर  फिरवला की जमीन आणि भिंतीवर फिरवला की भिंत स्वच्छ होईल. उंचावर असलेल्या वस्तूही तुम्ही या पद्धतीने स्वच्छ करू शकता.
तुम्हाला हात लावून किंवा खाली वाकून स्वच्छता करायची गरज नाही. अगदी काही तासात फार  मेहनत न घेता तुम्ही घर स्वच्छ करू शकता.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Jugaad Video : घरभर फिरवा फक्त प्लॅस्टिक बाटली, काही तासात घर चकाचक होईल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement