advertisement

Do You Know : भूगर्भातील गुपित उलगडणारा प्राणी, ज्याला आधीच कळतात भूकंपाचे धक्के

Last Updated:

तुम्हाला माहितीय का की असा एक प्राणी आहे, ज्याला कोणत्याही टेक्नोलॉजी शिवाय भूकंप येणार असल्याचे संकेत मिळतात.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : जगात असे काही देश आहेत, जे वारंवार भूकंप येत असतात, तर काहींना याचे धक्के ही जाणवतात. अशावेळी भूकंप तज्ञ काही वेळेला आधीच याची माहिती देतात, तर कधी कधी त्यांना ही भूकंपाचा अंदाज बांधणं कठीण होतं. अशावेळी जीवीतहानी भरपूर होते. शिवाय इतर मालमत्तचं देखील नुकसान होतं. त्यावेळी असं वाटतं की या सगळ्याबद्दल आधीच कळालं असतं तर किती बरं झालं असतं.
अशावेळी लोक विचार करतात की आपल्याकडे चांगली टेक्नोलॉजी असती तर किती बरं झालं असतं. त्याचा खूप फायदा झाला असता. पण तुम्हाला माहितीय का की असा एक प्राणी आहे, ज्याला कोणत्याही टेक्नोलॉजी शिवाय भूकंप येणार असल्याचे संकेत मिळतात.
हा प्राणी आपल्या आजूबाजूला रहातो. ज्याला भूकंपाचे संकेत सर्वात आधी मिळतात. ज्यामुळे त्याला प्राण्यांच्या जगातील 'भूकंप तज्ज्ञ' म्हटलं जातं. आता तुम्हाला नक्कीच या प्राण्याचं नाव आणि त्याच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुक्ता वाढली असेल.
advertisement
हा प्राणी आहे पाल. मेरीलँड विद्यापीठातील संशोधकांना असे आढळून आले आहे की पाल जमीनीच्या आतील कंपन ओळखण्यासाठी समतोलाशी संबंधित प्रणाली वापरतात. या प्राण्यांना श्रवण आणि स्पर्शजन्य उत्तेजनातून कळतं.
करंट बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात, संशोधकांनी उघड केले की पाल कमी-फ्रिक्वेंसी कंपन शोधण्यासाठी सॅक्युल्स वापरतात. सॅक्युल हा पालिंच्या कानाच्या आतील एक भाग आहे. हे पारंपारिकपणे संतुलन आणि शरीराची स्थिती राखण्याशी संबंधित आहे.
advertisement
"आपल्या सर्वांना हे माहीत आहे की, कानाला हवेत वाहून जाणारे आवाज ऐकू येतात. हा प्राचीन अंतर्गत मार्ग सामान्यत: संतुलनाशी संबंधित असतो," असे अभ्यासाच्या सह-लेखिका कॅथरीन कॅर, यूएमडी येथील जीवशास्त्राच्या प्रतिष्ठित विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी सांगितले. परंतू पाली या जमीनीवर किंवा भिंतीवर रहात असल्या कारणामुळे त्यांना ही कंपन लवकर कळतात.
खरंतर हा पर्याय उभयचर आणि माशांसाठी अस्तित्वात होता, परंतु आता पालिंमध्ये देखील संरक्षित असल्याचे आढळले आहे. सॅक्युल्स 50 ते 200 हर्ट्झच्या वारंवारतेला प्रतिसाद देतात. ज्यामुळे त्यांना भूकंपाची कंपनी लक्षात येतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Do You Know : भूगर्भातील गुपित उलगडणारा प्राणी, ज्याला आधीच कळतात भूकंपाचे धक्के
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement