ड्रेसला आग लावून केली एण्ट्री, वेडिंगमध्ये कपलचा थरारक स्टंट; पाहा Video
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
आपलं लग्न खास व्हावं, लग्नामध्ये इतरांपेक्षा काहीतरी हटके असावं असं प्रत्येक नवरा नवरीला वाटत असतं. त्यामुळे लग्न आठवणीत रहावं, काही चांगले आणि वेगळे क्षण असावे यासाठी लोक लग्नांमध्ये अनेक गोष्टी प्लॅन करतात.
नवी दिल्ली : आपलं लग्न खास व्हावं, लग्नामध्ये इतरांपेक्षा काहीतरी हटके असावं असं प्रत्येक नवरा नवरीला वाटत असतं. त्यामुळे लग्न आठवणीत रहावं, काही चांगले आणि वेगळे क्षण असावे यासाठी लोक लग्नांमध्ये अनेक गोष्टी प्लॅन करतात. निरनिराळ्या लग्नांचे किस्से, फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. असाच लग्नातील आणखी एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. लग्नातील हा व्हिडीओ पाहून तुम्हीही शॉक व्हाल.
लग्नातील एका कपलनं स्वतःलाच आग लावल्याचं पहायला मिळत आहे. त्यांनी वेडिंग ड्रेसला आग लावून एण्ट्री घेतली. हे दृश्य पाहून अनेकांना भीतीही वाटली. मात्र काहीच वेळात हा व्हिडीओ वाऱ्यासारखा इंटनेटवर पसरला.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कपल एण्ट्री घेत आहे. मात्र अचानक त्यांच्या कपड्यांना आग लागते. ते फायर वेडिंग ड्रेसमध्ये एण्ट्री घेतात. हे दृश्य पाहून कोणीही घाबरेल मात्र त्यांनी प्रोफेशनच्या निदर्शनाखाली हा स्टंट केला आहे. व्हिडीओमध्ये त्यांनी हेही सांगितलंय की नवरा नवरदेव दोघंही स्टंट एक्टर आहे. त्यामुळे सावधानी घेत, प्रोटेक्शन वापरुनच त्यांनी लग्नावेळी हा स्टंट केला आहे. त्यामुळे त्यांनी व्हिडीओमध्ये वॉर्निगही दिलीय की, तुम्ही असा स्टंट करु नका जीवासोबत खेळ होऊ शकतो.
advertisement
Bride and groom set fire to their costumes pic.twitter.com/8Gp5enFur1
— Crazy Clips (@crazyclipsonly) January 27, 2024
@crazyclipsonly नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 16 सेकंदांचा हा भयानक स्टंटचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. कोणीही असा स्टंट पाहूनच घाबरेल करण्याची गोष्ट तर दूरच राहिली. व्हिडीओवर अनेक कमेंटही येत आहेत. अनेकांनी या स्टंटला जीवाशी खेळ म्हटलंय.
advertisement
दरम्यान, असे लग्नातील व्हिडीओ, स्टंटबाजीचे व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर समोर येत असतात. हटके व्हिडीओ काही वेळातच इंटरनेटवर नेहमी चर्चेचा विषय ठरतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2024 1:57 PM IST









